ETV Bharat / bharat

अयोध्यामध्ये पीकअप-ट्रकची समोरासमोर धडक, 20 स्थलांतरीत कामगार जखमी - अयोध्या अपघात न्यूज

अयोध्यामध्ये रस्ता अपघातामध्ये 20 स्थलांतरीत कामगार जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना त्वरित घटनास्थळी पोहचण्याच्या व सर्व जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

migrant laborers accident
migrant laborers accident
author img

By

Published : May 18, 2020, 10:26 AM IST

अयोध्या - शहरामधील कोतवाली नगरच्या जानौरा नाका बायपासजवळील एचएन -28 येथे एका पिकअप आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 20 प्रवासी कामगार जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना त्वरित घटनास्थळी पोहोचण्याच्या व सर्व जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व कामगार मुंबईहून सिद्धार्थनगरला जात होते, अशी माहिती आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने मजुरांची गैरसोय होत आहे. हातावर पोट असलेले हे मजुर आपल्या घराचं ओढीनं प्रवास करत आहेत. इतर राज्यातून येणारे स्थलांतरित कामगार सतत अपघातांना बळी पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील मिहौली भागात झालेल्या अपघातामध्ये 26 स्थलांतरीत कामगार ठार झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.