आग्रा - उत्तर प्रदेशमधील दिल्ली हावडा रेल्वे लाईनवरील रेल्वेचा अपघात झाला आहे. बरहन रेल्वे स्थानक आणि मितावली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेखाली चिरडून 20 गायी दगावल्या आहेत.
हेही वाचा - महिला बस वाहकावर दोन अज्ञातांचा अॅसिड हल्ला..
गायी रेल्वेखाली चिरडल्या गेल्यामुळे गायींचे मांस रेल्वेच्या चाकामध्ये अडकले आणि गाडीत बिघाड झाला. त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे पाणी व खाद्यान्नाअभावी प्रवाशांचे हाल झाले. या अपघातामध्ये गाडी रुळावरुन घसरली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - breaking news उन्नाव बलात्कार प्रकरण: मुख्य आरोपी कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा
विशेषत: हावडा-दिल्ली आणि हावडा-मुंबई स्थानकांदरम्यान ट्रॅकवर कुंपण घालण्याच्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. कुंपण घालण्याचे कामही काम सुरू झाले असल्याचे उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अजितकुमार सिंह यांनी सांगितले.