ETV Bharat / bharat

वंदे भारत मिशन: युएईत अडकलेल्या नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान चैन्नईत दाखल - युएई

पहिले विमान 182 भारतीयांना घेऊन चैन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यामध्ये 3 लहान मुलांचीही समावेश आहे. त्यानंतर काही काळातच दुसरी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX540 चैन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. हे विमान दुबईवरून १७७ प्रवासी घेऊन भारतात आले आहे.

Two special flights from UAE with over 350 passengers reach Chennai

author img

By

Published : May 9, 2020, 8:57 AM IST

चैन्नई - कोरोना महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने सर्वात मोठे 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. त्याअंतर्गत एअर इंडियाचे दोन विमाने 350 भारतीयांना दुबईतून घेऊन आले आहे.

पहिले विमान 182 भारतीयांना घेऊन चैन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. त्यानंतर काही काळातच दुसरी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX540 चैन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. हे विमान दुबईवरून १७७ प्रवासी घेऊन भारतात आले आहे.

भारतात आणलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यातील नागरिक असतील तेथे त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

'वंदे भारत मिशन' ऑपरेशन अंतर्गत विविध देशांमध्ये ६४ विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या मिशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये १४ हजार ८०० नागरिकांना भारतात आणले जाणार आहे. ७ मे पासून हे मिशन सुरू करण्यात आले असून सर्व प्रवाशांकडून एका बाजूच्या प्रवाशाचे भाडे घेण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.