ETV Bharat / bharat

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 हजार 601; रुग्ण बरे होण्याचा दर 17.48 टक्के - icmr corona update

आत्तापर्यंत 4 लाख 49 हजार 810 नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. काल दिवसभरात 35 हजार 852 नागरिकांची चाचणी घेण्यात आली.

file pic
लव अगरवाल संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2020, 5:59 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांनी 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळून आले असून 3 हजार 252 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (सोमवार) दिवसभरात 705 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 17.48 टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

  • Till now, there are 18601 positive cases. So far, 3252 people have recovered including 705 people who recovered yesterday. This takes our recovery percentage to 17.48%: Lav Agrawal, Joint Secy, Health Ministry pic.twitter.com/Y9xP3Toq0J

    — ANI (@ANI) April 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर आत्तापर्यंत 4 लाख 49 हजार 810 नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. काल दिवसभरात 35 हजार 852 नागरिकांची चाचणी घेण्यात आली. यातील 29 हजार 776 नमुने आयसीएमआरच्या 201 लॅबमध्ये तपासण्यात आले. तर उर्वरित 6 हजार 76 चाचण्या 86 खासगी लॅबमध्ये करण्यात आल्या, अशी माहिती आयसीएमआरचे आर. गंगाखेडकर यांनी दिली.

रॅपीड टेस्टिंग किटचा वापर थांबवा

रॅपीड टेस्टिंग कीटचा वापर दोन दिवस न करण्याचे निर्देश आयसीएमआरने राज्य सरकारांना दिले आहेत. लोकांमध्ये जाऊन नागरिकांची तपासणी करणाऱ्या पथकांकडून कीट कसे काम करते हे पाहण्यात येत आहे. आयसीएमआर दोन दिवसांत पुढील निर्देश जारी करेल, असे गंगाखेडकर यांनी सांगितले. रॅपिड टेस्टिंग कीटद्वारे चुकीचे आणि वेगवेगळे निष्कर्ष समोर येत आहे. या कारणामुळे राजस्थानने या चाचणी कीटचा वापर थांबवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.