ETV Bharat / bharat

मागील 24 तासांत देशभरात 1 हजार 752 कोरोनाग्रस्त, तर 37 जणांचा मृत्यू - corona news

आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याने देशात 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 813 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

1752 new COVID19 cases and 37 deaths reported in the last 24 hours, ministry of health
मागील 24 तासांत देशभरात 1 हजार 752 कोरोनाग्रस्त, तर 37 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Apr 24, 2020, 9:15 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा भारतातील प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील 24 तासांत 1 हजार 752 रुग्ण आढळून आले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार देशभरातील रुग्णांचा आकडा 24 हजार 452 झाला आहे.

आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याने देशात 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 813 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी 17 हजार 915 अ‌ॅक्टीव्ह केसेस आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 20.57 टक्के झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मागील 28 दिवसांत 15 जिल्ह्यात एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. तर 80 जिल्ह्यामध्ये मागील 14 दिवसांत एकही नवी केस समोर आली नाही, अशी अगरवाल यांनी दिली.

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना निगराणीखाली ठेवणे, यास आमची प्राथमिकता आहे. त्यानुसार 9 लाख 45 हजार नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.