जमशेदपूर - गोविंदपूर पोलीस ठाणे परिसरातील यशोदानगरमध्ये लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर तब्बल 150 लोक विषबाधेने आजारी पडले आहे. येथे जेवण केल्यानंतर हळूहळू सर्वांची प्रकृती बिघडू लागली.
150 लोकांना अन्नविषबाधा
विषबाधीत लोकांना गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना मोठ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. आतापर्यंत 150 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 10 जणांची प्रकृती नाजूक बनली आहे. आजारी पडलेल्या एकूण लोकांमध्ये 9 ते 11 वर्षे वयोगटातील अनेक लहान मुलांचा समावेश आहे.
येथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात एक लग्नसमारंभ होता. येथे जेवल्यानंतर लोकांची तब्येत बिघडली. यानंतर या सर्वांना घाईघाईने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच येथील संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले.