ETV Bharat / bharat

कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याने बनवली टोपी आणि रोबोट! - अलवर हात धुणारा रोबोट न्यूज

अलवरमधील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने सोशल डिस्टन्स ठेवण्यास मदत करणारी टोपी आणि हात धुण्याची सुचना देणारा रोबोट तयार केला आहे. कुणाल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो अलवरच्या काला कुआँमधील सेक्टर-२ मध्ये राहतो.

hat and robot made by Kunal
कुणालने तयार केली टोपी आणि रोबोट
author img

By

Published : Jun 7, 2020, 7:35 PM IST

जयपूर - आपल्या देशातील विद्यार्थ्यांमध्ये असंख्य संशोधक दडलेले आहेत, ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. अलवरमधील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने सोशल डिस्टन्स ठेवण्यास मदत करणारी टोपी आणि हात धुण्याची सुचना देणारा रोबोट तयार केला आहे. कुणाल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो अलवरच्या काला कुआँमधील सेक्टर-२ मध्ये राहतो. कुणालने या अगोदरही अनेक स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर राजस्थानचे प्रतिनिधीत्व केले आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याने बनवली टोपी आणि रोबोट

कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात बसून होते. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही सर्व परिस्थीती पाहून आपणही काहीतरी करावे असे मनात आले. त्यामुळे मी ही टोपी आणि रोबोट तयार केला, असे कुणालने सांगितले.

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकून कुणालने टोपी आणि रोबोट तयार केले आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून कुणाल विविध प्रकारचे संशोधन करत आला आहे. या अगोदर त्याने गवत कापण्याची सौर उर्जेवर चालणारी मशीन तयार केली होती. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे रोबोट आणि मशीन कुणालने घरीच तयार केले आहेत. कुणालला वडिल नाहीत. तो आपल्या आई आणि बहिणीसह अलवारमध्ये राहतो. सोयी-सुविधांचा अभाव असतानाही कुणालने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी टोपी आणि रोबोटची निर्मिती केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.