नवी दिल्ली - जगभरात हजारोंचा बळी घेऊन आर्थिक संकट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूची चिंता आता भारतालाही लागली आहे. भारतात आलेल्या 21 पैकी 15 इटली पर्यटक हे कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
-
15 out of 21 Italian tourists test positive for #coronavirus: Sources pic.twitter.com/J4Ki8gVlcz
— DD News (@DDNewslive) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">15 out of 21 Italian tourists test positive for #coronavirus: Sources pic.twitter.com/J4Ki8gVlcz
— DD News (@DDNewslive) March 4, 202015 out of 21 Italian tourists test positive for #coronavirus: Sources pic.twitter.com/J4Ki8gVlcz
— DD News (@DDNewslive) March 4, 2020
21 इटली पर्यटकांना आयटीबीपीमधील शिबिरामध्ये निरक्षणाखाली ठेवले होते. त्यांच्यापैकी 15 जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यांना विशेष कक्षामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्या सर्वांची तपासणी सुरू आहे. त्यांना कोरोना विषाणूची लागण असल्याची पुष्टी दिल्ली एम्सने दिली आहे.
दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांद्वारे कोरोनाचा संसर्ग भारतात पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या देशांचे जे नागरिक अद्याप भारतात पोहोचलेले नाहीत, त्यांना मंजूर केलेले व्हिसा तात्पुरते स्थगित केले आहेत. मंत्रालयाने याबाबतची अॅडव्हायजरी मंगळवारी जारी केली.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वांत प्रथम चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. यानंतर जगभरातील देशांमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाला. सध्या भारतातही सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात राजधानी दिल्लीतील एकाचा समावेश आहे.