हैदराबाद (तेलंगणा)- नेहरू झुलॉजिकल पार्क येथील चौदा वर्षीय पांढऱ्या बंगाली वाघाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. या वाघाचे नाव 'बद्री' असे होते. वाघाच्या मानेत पाच किलो वजनाची गाठ झाल्याने त्याची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वाघाने शुक्रवारी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच याच पार्कमधील विनय नावाच्या २१ वर्षीय पांढऱ्या रॉयल बंगाली वाघाचा वयोमानामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता बद्रीचा मृत्यू झाल्याने व्याघ्रप्रेमी आणि प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.