कन्नूर - दुबईच्या इंडियन हायस्कूलमध्ये शिकणारी एक भारतीय मुलगी चक्क ११६ विविध भाषांमध्ये गाणे गाते. ऐकूण थक्क झालात ना.. पण, हे खरं आहे. भारताच्या केरळ राज्यातील कन्नूर येथील १३ वर्षाची सुचेता ही तब्बल ११६ विविध भाषेत गाणे गाते. इतकेच नव्हे तर सुचिताने ६ तासात ११२ भाषेत गाणी गाण्याचा विश्व विक्रम स्थापित केला आहे. पाहुया तिचा हा अद्भूत प्रवास...
सुचेता भारतातील कन्नूरच्या थालेसरी येथील रहिवासी आहे. ती दुबईच्या इंडियन हाई स्कूल मध्ये ९ व्या वर्गात शिकते. सुचेता ने गाणे गाण्याची सुरुवात जपानी भाषेनी केली होती आणि आता ती तब्बल ११६ भाषामंध्ये गाणे गाते. एवढेच नव्हे तर तिने १०२ विविध भाषांमध्ये गाणे गाण्याचाही किर्तीमान प्रस्थापित केला आहे.
सुचेताच्या घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे तिला सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या भाषेतील गाणी गाण्यात रुची होती. तिच्या या आवडीमुळेच तिने गाणे गायला सुरुवात केली. यासाठी घरच्यांनीही तिला प्रोत्साहन दिले. सुचेता ने दोन वर्षापूर्वी दुबई येथील इंडियन कॉन्सुलेट हॉलमध्ये OND म्युझिक बियॉन्ड बाउंड्रीज नावाच्या एका संगीत कार्यक्रमात भाग घेतला होता. यात १०२ वेगवेगळ्या भाषेत गाणे गात तिने विश्व विक्रमही स्थापित केला. यातील २६ गाणे भारतीय भाषेतील तर, ७६ गाणे हे विदेशी भाषेतले होते.
सुचेताने गायलेल्या गाण्यांचा अल्बमची विक्री करून तब्बल ५ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी केरळ येथे आलेल्या पुरात सापडलेल्या नागरिकांसाठी तिने ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केली. महत्वाचे म्हणजे सुचेताला पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे आयोजित एका कार्यक्रमात गाणे गायची संधी देखील मिळाली आहे. या संधीला ती तिच्या जिवनातील सर्वात मोठी गोष्ट मानते. वेगवेगळ्या भाषेत गाणे गाण्याची तिची ही कला आश्चर्यकारक आहे. तीन वर्षापासून संगिताचे शिक्षण घेत असलेल्या सुचेताचे भविष्यात जास्तीत जास्त भाषांमध्ये गाणी गायचे स्वप्न असून तिने यावर काम करायला सुरुवात केली आहे.