नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये पंतप्रधान किसान योजनेत 110 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान किसान योजनेमध्ये कोरोना काळात सरकारी अधिकारी, संगणक केंद्रे आणि मध्यस्थांच्या मदतीने हा घोटाळा झाल्याचे मुख्य सचिव गगनदीप सिंह बेदी यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात काही निर्बंध शिथिल केल्यानंतर हा घोटाळा करण्यात आल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांच्या लाभासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून पात्र नसेल्यांना फायदा झाला आहे. हा प्रकार 13 जिल्ह्यात झाला असून या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. या योजनेशी संबधित 80 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अन्य 34 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे मुख्य सचिव गगनदीप सिंह बेदी यांनी सांगितले.