जयपूर - राजस्थानातील जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर 11 जणांचा मृतदेह आढळून आला, तर एक युवक गंभीर अवस्थेत असल्याने त्याला सरकारी दवाखाण्यात तत्काळ दाखल करण्यात आले. जोधपूरजवळील देचू पोलीस ठाणे क्षेत्रातील लोडता गावात ही घटना घडली. 11 ही जणांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला आहे.
गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये 2 पुरुष, 4 महिला आणि 5 बालकांचा समावेश आहे. मृत कुटुंबिय भिल्ल समाजातील असून काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून भारतात विस्थापित झाले आहे. लोडता गावातील एका विहरीवर सर्वजण काम करत होते. तसचे जवळच एक झोपडी बांधून राहत होते.
विष किंवा किटकनाशकामुळे मृत्यू -
कुटुंबियांनी विष किंवा किटकनाशक प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. जोधपूर ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस अधिक्षकांसह मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे.