ETV Bharat / bharat

पाक विस्थापित कुटुंबीय मृत्यू प्रकरण: नातेवाईकांनी अन् गुंडांनी दिला त्रास.. पीडित महिलेचा व्हिडिओ समोर

पाकिस्तानात धार्मिक अत्याचाराच्या भीतीने २०१५ साली आम्ही भारतात आलो. मात्र, येथे आल्यानंतर काही गुंडांनी आणि आमच्या नातेवाईकांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये लक्ष्मी नामक महिलेने म्हटले आहे.

author img

By

Published : Aug 12, 2020, 7:50 PM IST

11 Pak migrants' alleged suicide
पाक विस्थापित कुटुंबीय मृत्यू प्रकरण

जयपूर - राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यात रविवारी (९ ऑगस्ट) पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणी आता एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नातेवाईक आणि गुंडांकडून त्रास होत असल्याचे लक्ष्मी नामक पीडित महिला सांगत आहे. सुमारे दीड तासाचा हा व्हिडिओ असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

पाकिस्तानात धार्मिक अत्याचाराच्या भीतीने २०१५ साली आम्ही भारतात आलो. मात्र, येथे आल्यानंतर काही गुंडांनी आणि आमच्या नातेवाईकांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये लक्ष्मी नामक महिलेने म्हटले आहे. भारतामध्येही आम्हाला त्रास सहन करावा लागेल याची कल्पना नव्हती. नातेवाईकांच्या आग्रहानंतर आम्ही भारतात आलो. त्यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली. आमच्या कुटुंबातील प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवले जात होते, असा आरोप या महिलेने केला आहे. या महिलेचाही मृत्यू झालेला आहे.

जोधपूरजवळील देचू पोलीस ठाणे क्षेत्रातील लोडता गावात ही घटना घडली होती. 11 ही जणांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला आहे. मृतदेहाशेजारी विष आणि काही इंनजेक्शन आढळून आली होती. विष प्यायल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले होते.कौटुंबिक वादातून हे प्रकरण घडल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.

मृतांमध्ये 2 पुरुष, 4 महिला आणि 5 बालकांचा समावेश आहे. मृत कुटुंबिय भिल्ल समाजातील असून २०१५ साली पाकिस्तानातून भारतात विस्थापित झाले होते. लोडता गावातील एका शेतात सर्वजण काम करत होते. तसचे जवळच एक झोपडी बांधून राहत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.