ETV Bharat / bharat

सलाम..! कोरोनाशी लढण्यासाठी 101 वर्षीय आजीची 1 लाख 6 हजारांची मदत

लीलावती जैन या महिलेने कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी आपल्या जमापुंजीतून 1 लाख 6 हजार 101 रुपये निधी म्हणून दिले आहेत. या रकमेचा धनादेश कोटा शहर जिल्हाधिकारी आरडी मीणा यांच्याकडे देण्यात आला.

Kota
कोरोनाशी लढण्यासाठी 101 वर्षीय आजीची 1 लाख 6 हजाराची मदत
author img

By

Published : Apr 5, 2020, 10:37 AM IST

जयपूर - संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं असतानाच देशातही कोरोना व्हायरस फोफावत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी मदत करण्याचं आवाहनही देशातील नागरिकांना करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात अनेक जण देशासाठी फूल ना फूलाची पाकळी म्हणून मदत करत आहेत. असेच राजस्थानच्या कोटामधील एक 101 वर्षीय महिला कोरोनाच्या युद्धाला तोंड देण्यासाठी मदतीसाठी पुढे सरसावली आहे. लीलावती जैन असे या महिलेचे नाव आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी 101 वर्षीय आजीची 1 लाख 6 हजाराची मदत

लीलावती जैन या महिलेनेही कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी आपल्या जमा झालेल्या पैशातून 1 लाख 6 हजार 101 रुपये निधी म्हणून दिले आहेत. या रकमेचा धनादेश कोटा शहर जिल्हाधिकारी आरडी मीणा यांच्याकडे देण्यात आला.

लीलावती यांचा मुलगा सुधीर जैन यांनी सांगितले की, घरात कोरोनाव्हायरस आजाराबाबत संभाषण सुरू होते त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मदत केली आहे. त्यानंतर त्यांच्या आईनेही सांगितले की, माझ्याकडेही जे पैसे आहेत, ते देशासाठी मदत म्हणून द्यायचे आहेत.

लीलावती जैन यांना आता चालता येत नाही. त्यांना चालताना कशाचा तरी आधार घेऊन चालावे लागते. त्यामुळे त्यांनी मदत करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगा, असे सांगितले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी आपले कर्मचारी पाठवून मदत स्वीकारली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.