अमरावती - आंध्र प्रदेशच्या तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून झालेल्या अपघातांत एकूण दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
एसपीएस नेल्लोर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वीज कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला. तर, गुंतुर जिल्ह्यामध्ये दोन आणि प्रकासम जिल्ह्यामध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने लोकांना अगोदरच खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. तरीही या दुर्घटना घडल्या.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी साडेदहा आणि अकराच्या सुमारास त्यांनी लोकांना बल्क एसएमएस द्वारे, आणि व्हॉट्सअॅप द्वारे यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास वीज कोसळून नेल्लोरच्या दगडार्तीमध्ये तिघांचा मृत्यू झाला.
आपत्ती व्यवस्थापन आयुक्त के. कन्ना बाबू यांनी लोकांना विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः शेतकरी आणि गुराख्यांनी पावसाची वा वीजांची शक्यता दिसताच तातडीने सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असे ते म्हटले.
हेही वाचा : जिंद पोलिसांची भन्नाट आयडिया, पंख्यापासून बनवले सॅनिटाईझ करणारे मशीन