इंफाळ (मणिपूर) Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज (15 जानेवारी) दुसरा दिवस आहे. मणिपूरच्या इंफाळ पश्चिमेतून या यात्रेला आज पहाटे पुन्हा सुरू झाली. दरम्यान, ही यात्रा सेकमाई येथून सुरू होऊन कांगपोकपी, नंतर मणिपूरमधील सेनापती आणि रात्री नागालँड येथे थांबेल. दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून 6 हजार 713 किलोमीटर अंतर पार करून 20 मार्च रोजी मुंबईमध्ये समाप्त होणार आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली. ते म्हणाले की, "भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता शिबिराच्या ठिकाणी सेवादलाने पारंपारिक ध्वजारोहणानं केली. मणिपूर पीसीसीचे अध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी ध्वजारोहण केले. ही यात्रा सेकमाई ते कांगपोकपी आणि नंतर मणिपूरमधील सेनापतीपर्यंत जाईल आणि शेवटी नागालँड येथे रात्री थांबेल.
-
भारत जोड़ो न्याय यात्रा के दूसरे दिन की शुरुआत सुबह 7:30 बजे कैंप स्थल पर सेवा दल द्वारा पारंपरिक रूप से किए गए ध्वजारोहण के साथ हुई। मणिपुर के पीसीसी अध्यक्ष @meghachandra_k ने ध्वजारोहण किया। यात्रा मणिपुर में सेकमाई से कांगपोकपी और फिर सेनापति से गुज़रते हुए जाएगी। आज रात में… pic.twitter.com/1iAYe9wM7d
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 15, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भारत जोड़ो न्याय यात्रा के दूसरे दिन की शुरुआत सुबह 7:30 बजे कैंप स्थल पर सेवा दल द्वारा पारंपरिक रूप से किए गए ध्वजारोहण के साथ हुई। मणिपुर के पीसीसी अध्यक्ष @meghachandra_k ने ध्वजारोहण किया। यात्रा मणिपुर में सेकमाई से कांगपोकपी और फिर सेनापति से गुज़रते हुए जाएगी। आज रात में… pic.twitter.com/1iAYe9wM7d
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 15, 2024भारत जोड़ो न्याय यात्रा के दूसरे दिन की शुरुआत सुबह 7:30 बजे कैंप स्थल पर सेवा दल द्वारा पारंपरिक रूप से किए गए ध्वजारोहण के साथ हुई। मणिपुर के पीसीसी अध्यक्ष @meghachandra_k ने ध्वजारोहण किया। यात्रा मणिपुर में सेकमाई से कांगपोकपी और फिर सेनापति से गुज़रते हुए जाएगी। आज रात में… pic.twitter.com/1iAYe9wM7d
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 15, 2024
- कॉंग्रेसच्या सोशल मीडिया प्रतिनिधी सुप्रिया श्रीनेट एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, "न्यायासाठी आवाज उठवत प्रत्येक अन्यायाविरुद्ध सज्ज व्हा. आम्ही बेरोजगारी, महागाई, गरिबी, गुन्हेगारी, असुरक्षितता यावर एकजुटीनं तोडगा काढू."
भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात : दरम्यान, रविवारी पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी मणिपूरच्या थौबल येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ही यात्रा 67 दिवसांत 110 जिल्ह्यांतून 6,713 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राज्यातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली.
काय म्हणाले राहुल गांधी : "भारत जोडो यात्रे दरम्यान जसा आम्ही दक्षिण-उत्तर पायी प्रवास केला, तसाच पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करावा अशी माझी इच्छा होती. लोकांनी यात्रा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या. काही पूर्वेकडून तर काही पश्चिमेकडून सुरुवात करण्यास सांगत होते. पण मी म्हणालो, पुढची भारत जोडो यात्रा मणिपूरमधूनच सुरू होऊ शकते", असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -