हैदराबाद - आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आता भगवंत मान असेल. पत्रकार परिषदेत घोषणा करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, 21 लाखांहून अधिक लोकांनी आपले मत दिले, ज्यामध्ये 93 टक्के लोकांनी भगवंत मान यांच्या बाजूने मतदान केले.
पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी इतर पक्षांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, इतर पक्ष आपला मुलगा, सून किंवा घरच्या माणसाला मुख्यमंत्री चेहरा बनवायचे. पण 'आप'ने तसे केले नाही. भगवंत मान हे माझे धाकटे भाऊ असल्याचे केजरीवाल म्हणाले. मी थेट त्यांचे नाव दिले असते तर घराणेशाहीचे आरोप झाले असते. केजरीवालांनी भावाला उमेदवारी दिली असे लोक म्हणतील. त्यामुळे सार्वजनिक मतदानाने हा निर्णय घेण्यात आला. केजरीवाल यांनी सांगितले की, सार्वजनिक मतदानात २१ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले. यामध्ये भगवंत मान यांच्या बाजूने ९३.३ टक्के मते पडली.
-
#WATCH | Delhi CM & Aam Aadmi Party's national convenor Arvind Kejriwal announces party's chief ministerial candidate for the upcoming Punjab Assembly elections pic.twitter.com/cBEsKHAhEu
— ANI (@ANI) January 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Delhi CM & Aam Aadmi Party's national convenor Arvind Kejriwal announces party's chief ministerial candidate for the upcoming Punjab Assembly elections pic.twitter.com/cBEsKHAhEu
— ANI (@ANI) January 18, 2022#WATCH | Delhi CM & Aam Aadmi Party's national convenor Arvind Kejriwal announces party's chief ministerial candidate for the upcoming Punjab Assembly elections pic.twitter.com/cBEsKHAhEu
— ANI (@ANI) January 18, 2022
दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. केजरीवाल यांच्या मते, सिद्धू यांनाही आपच्या सर्वेक्षणात ३.६ टक्के मते मिळाली आहेत. केजरीवाल म्हणाले की, मलाही मुख्यमंत्री बनवण्यासाठी अनेकांनी मतदान केले. पण मी पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होणार नाही, असे आधीच सांगितले होते. आम आदमी पक्षाने 17 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत लोकांची मते मागवली होती. पंजाबमध्ये 'आप'ला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवण्यासाठी 21 लाखांहून अधिक लोकांनी आपले मत पाठवल्याचा आपचा दावा आहे. दाव्यानुसार, 17 जानेवारीपर्यंत 21.59 लाख लोकांनी व्हॉट्सअॅप, कॉल आणि मेसेजवर सीएम उमेदवाराच्या चेहऱ्यावर सूचना दिल्या आहेत.
कोण आहे भगवंत मान -
आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान हे पंजाब, संगरूरमधील सर्वात मोठा चेहरा आहेत. त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली. पक्षात त्यांची चांगली पकड आहे. त्यांच्या शैलीमुळे ते मालवा प्रदेशासह संपूर्ण पंजाबमध्ये खूप लोकप्रिय आहे. ते जाट या शीख समुदायातून आले आहेत. युवा नेते भगवंत मान यांची स्पष्ट प्रतिमा आणि बोलण्याची शैली हे त्यांचे बलस्थान आहे. काही राजकिय विश्लेषकांनी त्यांच्यावर दारूच्या व्यसनाचा आरोप केला आहे.