बंगळुरू : मतदारांची वैयक्तिक माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याच्या चिलुमे संघटनेच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. मात्र बंगळुरू शहरात मतदारांची वैयक्तिक माहिती उमेदवारांना विकल्याचे आणखी प्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे बंगळुरू शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी याबाबतची माहितीबाबत गोपनियता ठेवण्यासाठी पोलिसांनी कंपनीचे नाव उघड केले नसल्याची माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली.
केवळ 25 हजारात विकली माहिती : निवडणुकीतील उमेदवारांनी 25 हजार रुपये भरल्यास कंपनी त्या मतदारसंघातील मतदारांची माहिती देत होती. लाखो मतदारांची माहिती अवघ्या 25 हजारांना विकणार असल्याचे सांगणाऱ्या अज्ञात वेबसाइट आणि अॅप कंपनीविरुद्ध दक्षिण पूर्व विभागाच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कंपनी मतदारांची संपूर्ण माहिती गोळा करत होती. नंतर स्वतंत्र अॅप वापरून मतदाराची माहिती, नाव, पत्ता, जात, मतदाराने गेल्या वेळी कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला आणि यावेळी कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याची माहिती संबंधित उमेदवारांना पुरवल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
वेबसाईटवरच टाकले मतदारांचे मोबाईल क्रमांक : मतदारांची माहिती विकणाऱ्या या कंपनीने आपल्या वेबसाईटवरच मतदारांचे मोबईल क्रमांक टाकेल होते. केवळ २५ हजार रुपये भरल्यास उमेदवाराला लॉगिन आयडी देण्यात येत होता. सुमारे 6 लाख मतदारांची माहिती या कंपनीकडे असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ही मतदार यादी विशिष्ट मतदार संघाची आहे की दुसऱ्या मतदार संघाची माहिती आहे, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
उमेदवार हरला तर पैसे परत : मतदारांची माहिती विकणाऱ्या या वेबसाईटने उमेदवारांना अनेक ऑफर दिल्या आहेत. यात ही वेबसाइट उघडताच उमेदवारांना स्वागत संदेश मिळतो. त्यानंतर त्यांना २५ हजार रुपये सेवा शुल्क देऊन मतदार संघातील मतदारांची माहिती घेण्याचे आमिष दाखवले जाते. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या मतदारांच्या माहितीबाबत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अप्रतिम ऑफर देण्यात येत आहे. उमेदवार हरला तर पैसे परत केले जातील, अशीही या कंपनीने ऑफर दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपक्ष उमेदवाराने केली तक्रार : हा सर्व प्रकार समोर आल्याने राजू नावाच्या अपक्ष उमेदवाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दक्षिण पूर्व विभागाच्या सीईएन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक सर्वेक्षण कंपनीने केले आहे का? त्यांच्याकडे इतका डेटा कसा आला? यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी चिलुमे संस्थेने मतदारांची माहिती चोरल्याचे प्रकरण समोर आले होते. कथित मतदार डेटा चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मुख्य आरोपी आणि चिलुमे शैक्षणिक सांस्कृतिक आणि ग्रामीण विकास संस्थेच्या सहसंस्थापकाला अटक केली होती.
हेही वाचा - Amartya Sen Sues Visva Bharati : जागेच्या वाद प्रकरणी अमर्त्य सेन यांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; विश्वभारतीवर दाखल केला खटला