ETV Bharat / bharat

Bengaluru Crime : दोन कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याने उडाली खळबळ

दोन कुटुंबांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ( Five suicides In Two Families )

author img

By

Published : Dec 20, 2022, 2:08 PM IST

Bengaluru Tragedy
दोन कुटुंबात पाच आत्महत्या

बेंगळुरू : शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. महालक्ष्मी लेआऊट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंजनेय मंदिराजवळ एकाच कुटुंबातील तिघांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ( Five suicides In Two Families) या घटनेत आई यशोधा (72), मुलगी सुमन गुप्ता (32) आणि मुलगा नरेश गुप्ता (36) यांनी आत्महत्या केली. आई सोबत राहणारे सुमन आणि नरेश हे दोघेही अविवाहित होते. नरेश हे कंत्राटदार म्हणून काम करत होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. महालक्ष्मी लेआउट पोलीस सध्या घटनास्थळी भेट देऊन माहिती गोळा करत आहेत.

दिड वर्षाच्या मुलासह आत्महत्या : पतीकडून होणाऱ्या हुंड्याच्या छळाला कंटाळून महिलेने मुलासह आत्महत्या केल्याची घटना होस्कोटे तालुक्यातील काळकुंटे अग्रहारा गावात घडली. श्वेता (24) आणि दीड वर्षीय यक्षित अशी मृतांची नावे आहेत. श्वेताचा विवाह राकेशसोबत ३ वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर पती राकेशचे गावातील एका महिलेसोबत अवैध संबंध होते. याच मुद्द्यावरून बराच वेळा भांडण होत होते. कुटुंबीयांनी एकत्र येऊन पंचायत स्थापन केली. मात्र, राकेशने अवैध संबंध सोडले नाहीत. हुंड्या वरून पती आणि त्याचे कुटुंबीय महिलेवर अत्याचार करत होते. (Bengaluru Crime)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.