बंगळूर - कर्नाटकातील बंगळूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 34 वर्षीय व्यक्तीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करताना अटक केली आहे. या आरोपीने अनेक गायींसोबत असे अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. हा आरोपी येथील एका विद्यालयाच्या परिसरात झाडांच्या मागे जात गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. पोलिसांना या आरोपीला अटक केली असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली ( Man arrested for unnatural sex with cows ) आहे.
मंजूनाथ असे या आरोपीचे नाव आहे. तो मांड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलागेरे गावातील रहिवासी आहेत. मंजूनाथच्या मित्राने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची सवय लागली होती. त्यामुळे तो बंगळूरमधील एका विद्यालयाच्या मैदानात जात. तेथे चरायला येणाऱ्या गायींना झाडांच्या मागे नेत अनैसर्गिक कृत्य करायचा.
मंजूनाथच्या कृत्यांबाबत त्यांच्या घराच्यांना माहिती झाली होती. त्यामुळे त्यांनी त्याला घराबाहेर काढले होते. त्यानंतर मंजूनाथ बंगळूरुमधील आपल्या मित्राच्या घरी राहयला आला. मंजूनाथच्या मित्राच्या घरी गायी होत्या. एकदिवशी मंजूनाथच्या मित्राने त्याला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करताना पकडले होते. तेव्हा मंजूनाथने आपल्या सवयीबाबत त्याच्या मित्राला माहिती दिली होती.
याबाबतची माहिती मंजूनाथच्या मित्राने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मंजूनाथला गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करताना रंगेहात पकडले. पोलिसांनी मंजूनाथला फरपटत नेले. पोलिसांनी मंजूनाथवर प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयीने कोठडीत पाठवले आहे.