ETV Bharat / bharat

Beauty With Good Health : सौंदर्य टिकवण्यासाठी उत्तम आरोग्य महत्वाचे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी - Lifestyle

सुंदर दिसण्यासाठी आधी तुम्ही निरोगी असले पाहिजे. मात्र, बदललेल्या जीवनशैलीत वजन वाढण्यामागे आणि चेहऱ्याचा रंग कमी होण्याची काही कारणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर उपाय काय आहेत, ते जाणून घेऊया.

Beauty With Good Health
उत्तम आरोग्य चिरकाल सौंदर्य
author img

By

Published : Feb 11, 2023, 2:01 PM IST

चेहऱ्याचे आणि मनाचे सौंदर्य यांचे अतुट नाते आहे. तसेच आपल्या उत्तम प्रकृतीचे आणि सौंदर्याचे देखील अतुट नाते आहे. जर आपण निरोगी असेल, तर त्याचे तेज आपल्या चेहऱ्यावर दिसुन पडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासुन बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याची आणि चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्याची प्रक्रीया अनेकांच्या शरीरात घडतांना दिसून येत आहे, यावर उपाय काय ते जाणून घेऊया.

कसे जेवण घेता : तुम्हाला निरोगी व्हायचे आहे किंवा सुंदर दिसायचे आहे. तर शरीराला सर्व पोषक तत्वे संतुलित मिळायला हवीत. वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना हे तत्व विसरता कामा नये. कॅलरी मोजत असताना खाणे हे जास्त प्रमाणात खाण्याइतकेच चुकीचे आहे. तुम्हाला रोज मिळणाऱ्या पोषक तत्वांचे तुम्ही निरीक्षण केले आणि तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, भाज्या, कडधान्ये, दूध आणि अंडी यांचा समावेश असल्याची खात्री केली, तर तुमच्या सर्व समस्या लवकर आटोक्यात येतील.

कधी झोपता : जेव्हा नोकरी आणि नोकऱ्यांचे शिफ्ट बदलतात. परिणामी अश्यावेळी कोणतेही कारण न देता रात्रंदिवस कर्तव्य बजावावे लागत आहे. बराचवेळ डिजिटल गॅझेट्सचा वापर करीत असल्याने, झोपण्याच्या वेळेत बदल झाले. तरी किमान सात-आठ तास गाढ झोप घेतल्याशिवाय थकवा दूर होत नाही. आणि आपण दुसऱ्या दिवशी उत्साहाने काम करु शकत नाही. या गोष्टी लक्षात घेऊनच झोपा. वेळेवर झोपणे आणि उठणे हे शरीरात आनंदी हार्मोन्स निर्माण करतात.

तणावाचे नियोजन : बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येक कामात ताण येत आहे. जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन, भावनांवर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही कारणाचा ताण हा आरोग्याचा पहिल्या क्रमांकाचा एक शत्रू आहे. यावर मात करण्यासाठी ध्यान करा. योगाभ्यास करा. बागकाम आणि इतर छंदांवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला बरे वाटेल. ट्रेस मॅनेज करण्यास छंद हा उत्तम पर्याय आहे.

शारीरिक हालचाली: घेतलेल्या अन्नासाठी पुरेसा व्यायाम नसल्यास शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते. परिणामी, ताणतणाव, वजन जास्त असणे, मासिक पाळी चुकणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे तुमचा चेहरा, शरीराचे वजन आणि नंतर तुमच्या आरोग्यावर हानी पोहोचते. म्हणूनच तुम्हाला आवडेल तसा अर्धा तास व्यायामासाठी राखून ठेवावा. जर तुम्हाला जाॅगिंग किंवा चालणे आवडत नसेल तर, शक्य असल्यास घरी तुमच्या आवडत्या गाण्यावर नृत्य करा. साल्सा, झुंबा आणि वॉटर योगा क्लासेसला जा. वजनाची आणि आरोग्याच्या समस्या नियंत्रणात येतील.

हेही वाचा : Skin Care Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.