अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र ( Navratri Festival )असते. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत. हा उत्सव महिलांसाठी अतिशय खास असतो. महिलावर्ग पारंपरिक साड्या, दागिने परिधान करून श्रृंगार करतात. नवरात्रीचे व्रत करून दुर्गा मातेची मनोभावे सेवा करतात. कालानुरुप सण-उत्सव साजरे करण्याचे स्वरुपही बदलत आहे. पोषाख, दागिन्यांसह वेगवेगळ्या हेअरस्टाइलचीही क्रेझ महिलांमध्ये वाढत असल्याचे दिसते. यंदाच्या नवरात्रौत्सवासाठीही काही खास हेअरस्टाइल ( Hairstyle in Navratri ) करून तुम्ही स्वतःला हटके लुक देऊ शकता. ( Beautiful Different 4 Hairstyles )
- अंबाडा आणि गजरा - साडी नेसल्यानंतर गजऱ्यासह अंबाड्याची ही हेअरस्टाइल अतिशय सुंदर दिसते. तसे पाहायला गेले तर ही हेअरस्टाइल फार जुनी आहे. या साध्या आणि सोप्या हेअरस्टाइलमुळे सौंदर्यात अधिक भर पडते आणि हटके लुक देखील मिळतो. साधा अंबाडा बांधल्यानंतर यावर तुमच्या आवडत्या फुलांचा गजरा माळा. आणि दिसा सुदंर.
- साइड वेणी - यंदाच्या नवरात्रौत्सवामध्ये साइड वेणी हेअरस्टाइल नक्की ट्राय करून पाहा. केस हलकेसे कुरळे दिसण्यासाठी कर्लिंग आयरन टुलचा तुम्ही वापर करू शकता आणि एका बाजूने केसांमध्ये भांग पाडून फ्रेंच वेणी बांधून घ्या. पुढील बाजूनेही तुम्ही वेणी बांधू शकता. ही हेअरस्टाइल अतिशय सोपी आहे.
- स्टायलिश अंबाडा - स्टायलिश अंबाडा अंबाड्यामध्येही सध्या तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या स्टाइल पाहायला मिळतील. ब्रेडेड बन देखील एक सुंदर हेअरस्टाइल आहे, जी साडीवर अतिशय छान दिसते. केसांचा मधोमध भांग पाडा आणि केसांच्या छोटी-छोटी वेण्या बांधा. यानंतर स्टायलिश अंबाडा बांधून घ्या. यावर तुम्ही एखादे फुल किंवा गजरा माळू शकता.
- ब्रेडे बन - बनचा विचार करत असाल तर साध्या बनपासून ते मेसी बन यांसारखे बरेच पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये वेगवेगळे रंग आणि आकार पाहायला मिळतात. हे बन तुम्हाला अगदी ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होतात.