सहारनपूर (उत्तरप्रदेश): दरवेळेस वेगवेगळे फतवे काढून एकप्रकारे आदेश देणाऱ्या आणि फतव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जगप्रसिद्ध इस्लामिक शैक्षणिक संस्था दारुल उलूमने आता नवीन फतवा काढला आहे. त्यानुसार दारुल उलूम व्यवस्थापनाने त्यांच्या संस्थेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दाढी ठेवणे बंधनकारक केले आहे. संस्थेच्या आदेशाच्या विरोधात जात दाढी कापलेल्या चार विद्यार्थ्यांना संस्थेच्या बाहेर काढण्यात आले आहे. दारुल उलूमच्या या कारवाईमुळे मदरशातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचवेळी मोठ्या घोषणेनंतर दारुल उलूम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
विद्यार्थ्यांना देणार कठोर शिक्षा: संस्थेच्या व्यवस्थापन यंत्रणेने विद्यार्थ्यांची दाढी काढण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असल्याची माहिती देणारी नोटीस चिकटवली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने दाढी कापली तर त्याच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई केली जाईल, असे व्यवस्थापन यंत्रणेने नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. याच महिन्यात या आरोपात चार विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याची माहितीही व्यवस्थापनाने नोटीसमध्ये दिली होती.
दारुल उलूमचा निर्णय जगभरात महत्त्वाचा: जगप्रसिद्ध इस्लामिक शैक्षणिक संस्था असलेल्या दारुल उलूममध्ये जगभरातील मुस्लिम विद्यार्थी फक्त इस्लामिक शिक्षणच घेत नाहीत, तर दारुल उलूमचा निर्णय जगभरातील मुस्लिमांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. याच कारणामुळे दारुल उलूम देवबंदला 'फतव्यांचे शहर' म्हटले जाते. दारुल उलूम मॅनेजमेंट मदरसामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. उलेमांनी विद्यार्थ्यांना दाढी ठेवणे आता सक्तीचे केले आहे. यासाठी संस्थेकडून रितसर नोटीस चिकटवण्यात आली आहे.
शिस्तीत राहण्याचा सल्ला: शिक्षण विभागाचे प्रभारी मौलाना हुसेन अहमद हरिद्वारी यांनी चिकटवलेल्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: दाढी कापणाऱ्या विद्यार्थ्यांना कडक ताकीद देण्यात आली आहे. संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याने दाढी कापल्यास त्याच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई करण्यात येईल, असे या नोटिसीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अनोख्या फतव्यामुळे ही नोटीस आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
दाढी कापून येणाऱ्यांनाही प्रवेश नाही: त्याचबरोबर दाढी कापून संस्थेत प्रवेशासाठी येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. दाढी कापण्याच्या मुद्यावर व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना आपल्या कठोर भूमिकेची जाणीव करून दिली आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी टूर हदीसच्या चार विद्यार्थ्यांना दाढी कापल्याबद्दल बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. चार विद्यार्थ्यांनी माफीनामाही दिला, मात्र शिक्षण विभागाने तो स्वीकारला नाही.