ETV Bharat / bharat

Basavaraj Bommai Resignation CM Post: बसवराज बोम्मई यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

कर्नाटक विधानसभेत भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी आज संध्याकाळी उशिरा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Basavaraj Bommai Resignation CM Post
बसवराज बोम्मई यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
author img

By

Published : May 13, 2023, 10:47 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यासंदर्भात भाजप नेते बोम्मई यांनी सांगितले की, मी राज्यपालांकडे वेळ मागितला आणि राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

आम्ही हा निकाल सकारात्मकपणे घेऊ आणि पक्षाची पुनर्रचना करू : यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुनरागमन करेल, असे ते म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही पुनरागमन करू, असे ते म्हणाले. या संदर्भात हावेरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधानांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी खूप प्रयत्न करूनही निवडणुकीत आपली छाप सोडता आली नाही. काँग्रेस छाप पाडण्यात यशस्वी ठरली असही ते म्हणाले आहेत. आम्ही हा निकाल सकारात्मकपणे घेऊ आणि पक्षाची पुनर्रचना करू, जेणेकरून लोकसभा निवडणुकीत आम्हाला पुनरागमन करता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसचा विजय ही त्यांची संघटित निवडणूक रणनीती असू शकते : निवडणुकीत मोदी आणि शहा यांची जादू काही कामी आलेली नाही, असे विचारले असता बोम्मई म्हणाले की, या निवडणुकीच्या निकालामागे अनेक कारणे आहेत, त्याबाबत सखोल विश्लेषण केल्यानंतरच काही सांगता येईल. मात्र, काँग्रेसचा विजय ही त्यांची संघटित निवडणूक रणनीती असू शकते, असे ते म्हणाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही विश्लेषणासाठी बैठक घेऊ. एक राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून, आम्ही विश्लेषण करू आणि त्रुटी आणि कमतरता ओळखू आणि त्या दुरुस्त करू असही ते म्हणाले आहेत.

राजकीय प्रवास : बसवराज बोम्मई यांनी २००८ साली जेडीएस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला होता. बोम्मई यांच्यावर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या राजकारणाचे संस्कार झाले होते. त्यांचे वडील आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई हे मानवतावादी चळवळ आणि डावे नेते एम. एन. रॉय यांचे कट्टर अनुयायी होते. बसवराज बोम्मई यांनी १९९६-९७ साली राजकारणात पाऊल ठेवले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते जे. एच. पटेल यांचे राजकीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००७ साली वडील एस. आर. बोम्मई यांचे निधन झाल्यानंतर बसवराज यांनी निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवले. वडील एस. आर. बोम्मई यांना वाटत होते की, आपल्या मुलाने माझ्या नावाचा वापर करून राजकारणात जम बसवू नये, यासाठी त्यांच्या हयातीत बसवराज निवडणुकीला उभे राहिले नाहीत. ऑक्टोबर २००७ रोजी वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर बोम्मई यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. भाजपाने त्यांची महत्त्वकांक्षा पाहून त्यांना पक्षात स्थान दिले. भाजपाचे सर्वात मोठे नेते, लिंगायत समाजाचे पुढारी बीएस येडियुरप्पा यांनी बोम्मई यांना मदतीचा हात दिला. बोम्मई यांनी तेव्हाच शिग्गाव हा मतदारसंघ निवडला. याठिकाणी भाजपाचा कोणताही मोठा नेता नव्हता. २०१३, २००१८, आणि आता २०२३ साली सलग या मतदारसंघात बोम्मई विजयी झाले आहेत.

बोम्मई यांचा कार्यकाळ : कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवरजा बोम्मई ६३ वर्षाचे आहेत. बोम्मई यांनी २ सप्टेंबर २०२१ रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सुरुवातीचे त्यांचे दिवस चांगले होते. केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास होता. अमित शाह यांनी तर बोम्मई हे २०२३ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा चेहरा असतील, अशी घोषणा तेव्हाच केली होती.

काय म्हणाले बोम्मई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत झालेला पराभव स्वीकारला आहे. या संपुर्ण पराभवाची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. तसेच, आगामी काळात जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू असे म्हणत 2024 ला लोकसभेत आमचा विजय होई अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ते म्हणाले की काँग्रेसची निवडणूक रणनीती हे त्यांच्या विजयाचे एक प्रमुख कारण आहे. आज मी माझ्या पदाचा राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार असल्याचेही बोम्मई यांनी यावेळी सांगितले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला 136 जागेवर विजयी होत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, भाजप 65 जागा विजयी होत पराभूत झाले आहे.

हेही वाचा : Karnataka Elections: पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, बसवराज बोम्मई यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.