पाटणा : बरौनी नवी दिल्ली स्पेशल ट्रेनचा सिग्नालमुळे ट्रॅक चुकल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. ही घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये घडली. बरौनी नवी दिल्ली स्पेशल ट्रेनला नरकटियागंजच्या दिशेने जायचे होते, मात्र सिग्नलच्या चुकीमुळे ती हाजीपूरच्या दिशेने वळली. ट्रेनचा रस्ता चुकल्याचे लोको पायलटच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ सावधगिरी बाळगत इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.
सिग्नलच्या चुकीमुळे हाजीपूरच्या दिशेने वळली ट्रेन : बरौनी नवी दिल्ली स्पेशल ट्रेन मुझफ्फरपूरमधून नरकटियागंजच्या दिशेने जाणार होती. मात्र सिग्नलमधील चुकीच्या माहितीमुळे बरौनी नवी दिल्ली स्पेशल ट्रेन हाजीपूरच्या दिशेने निघाली होती. त्यामुळे लोको पायलटला आपला रस्ता चुकल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ रेल्वेचे इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. ट्रेन थांबवून त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती रेल्वे मुख्यालयाला कळवली.
लोको पायलटच्या सतर्कतेमुळे टळला अपघात : ट्रेन मुझफ्फरपूरमधून नरकटियागंजच्या दिशेने जाणारी बरौनी नवी दिल्ली स्पेशल ट्रेन ही हाजीपूरच्या दिशेने निघाली होती. रेल्वे थोडे पुढे गेल्यानंतर लोको पायलटला आपण चुकीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आले. लोको पायलटने आपत्कालीन स्थितीत ट्रेन थांबवल्याबाबत मुख्यालयाला कळवल्यावर गोंधळ उडाला. त्यानंतर गाडी पुन्हा जंक्शनवर आणण्यात आली. काही वेळाने मोतिहारी मार्गाचा सिग्नल देऊन पुन्हा ही रेल्वे रवाना करण्यात आली.
दोन कर्मचारी निलंबित : बरौनी नवी दिल्ली स्पेशल ट्रेनला चुकीचा सिग्नल दिल्यामुळे ही रेल्वे चुकीच्या दिशेने निघाली होती. चुकीच्या दिशेने रेल्वे पुढे गेली असती, तर अनर्थ झाला असता. रेल्वेच्या मोठ्या अपघाताची शक्यता होती. मात्र वेळीच लोको पायलटच्या लक्षात आपण चुकीच्या ट्रॅकवर असल्याचे आल्याने त्यांनी गाडी थांबवली. या प्रकरणी कर्तव्यात हलगर्जी केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने निलंबित केले आहे.