बारामूला : Terror in Kashmir : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला पोलिसांनी एका दहशतवादी भरती मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. (Baramulla Police) 10 सप्टेंबरला लष्कर-ए-तैयबाच्या संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक (3 Arrested Terrorist) करण्यात आली होती. त्यांच्याकडून 30 एके-47, हँड ग्रेनेड आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या संघटनेशी संबंधित इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याविरुद्ध UAPA आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशतवादी अटकेत : लतीफ अहमद दार, शौकत लोन आणि इशरत रसूल अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी सहयोगी म्हणून काम करत होते. हे तिघेही क्रेरीच्या भागात रेकी करत होते. तसेच तेथील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी ट्रेनिंग देत होते.
-
J&K | On September 10, Baramulla Police busted a Terrorist Recruitment Module and arrested 3 Terrorist Associates of the LeT outfit. Incriminating material including 3 hand grenades & 30 AK-47 live rounds were recovered from their possession. A case under sections UA(P) & Arms… pic.twitter.com/gHGgUpMIcc
— ANI (@ANI) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">J&K | On September 10, Baramulla Police busted a Terrorist Recruitment Module and arrested 3 Terrorist Associates of the LeT outfit. Incriminating material including 3 hand grenades & 30 AK-47 live rounds were recovered from their possession. A case under sections UA(P) & Arms… pic.twitter.com/gHGgUpMIcc
— ANI (@ANI) September 10, 2023J&K | On September 10, Baramulla Police busted a Terrorist Recruitment Module and arrested 3 Terrorist Associates of the LeT outfit. Incriminating material including 3 hand grenades & 30 AK-47 live rounds were recovered from their possession. A case under sections UA(P) & Arms… pic.twitter.com/gHGgUpMIcc
— ANI (@ANI) September 10, 2023
दोन दहशतवादी ठार : अटक केलेले तिघेही क्रेरी भागातील भरती मॉड्यूलचे मास्टरमाईंड होते. हे तिघेही सक्रिय दहशतवादी उमर लोन आणि एफटी उस्मान यांच्या संपर्कात होते. याआधी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. त्यांच्याकडून एके-47 रायफल आणि एक पिस्तूलसह इतर साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला होता.
भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला : या आधीही 23 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय सैन्य, पोलीस आणि एसएसबीच्या संयुक्त पथकांनी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवादी साथीदारांना जेरबंद करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांविरोधात पट्टण पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -