नवी दिल्ली - तुम्ही बँकांमध्ये नियमितपणे आर्थिक व्यवहार करत असताल तर ही महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्यात बँकांना एकूण 12 सुट्टी असणार आहेत. सणांमध्ये गणेश चतुर्थी, हरितालिका, श्री नारायण गुरू समाधी दिन, कर्म पुजा आदींचा समावेश आहे.
ऑगस्ट महिन्यात खासगी व सरकारी बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या वेळापत्रकामध्ये सप्टेंबर 2021 मधील बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक दिलेले आहे.
बँकांना असलेल्या आठवडाखेरच्या सुट्ट्या
5 सप्टेंबर, 2021 – साप्ताहिक सुट्टी (रविवार)
11 सप्टेंबर, 2021 – दुसरा शनिवार
12 सप्टेंबर, 2021 – साप्ताहिक सुट्टी (रविवार)
19 सप्टेंबर, 2021 – साप्ताहिक सुट्टी (रविवार)
25 सप्टेंबर, 2021 चौथा शनिवार
26 सप्टेंबर, 2021 – साप्ताहिक सुट्टी (रविवार)
8 सप्टेंबर, 2021: श्रीमंत शंकरदेव तिथी
9 सप्टेंबर, 2021: हरितालिका,
10 सप्टेंबर, 2021: विनायक चतुर्थी
11 सप्टेंबर, 2021: गणेश चतुर्थी (दुसरा दिवस)
17 सप्टेंबर, 2021: कर्म पुजा
20 सप्टेंबर, 2021: इंद्रजत्रा
21 सप्टेंबर, 2021: श्री नारायण गुरू समाधी दिन
हेही वाचा-आसाममध्ये डीएनएलएच्या अतिरेक्यांनी पेटवले ट्रक, 5 चालकांचा मृत्यू
8 सप्टेंबर, 2021: श्रीमंत शंकरदेव तिथीनमित्त गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असणार आहे.
9 सप्टेंबर, 2021:हरितालिकानिमित्त गंगटोकमधील बँकांना सुट्टी असणार आहे.
10 सप्टेंबर, 2021: गणेशचतुर्थीनिमित्त बहुतांश बँकांना सुट्टी असणार आहे. ऐझाव्ल, आगरतळा, भोपाळ, गंगटोक, चंदीगड, डेहराडून, इम्फाळ, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, नवी दिल्ली, पाटणा, शिमला, रायपूर, शिलाँग, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम या शहरांमधील बँकांना सुट्टी नसेल.
11 सप्टेंबर, 2021: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पणजीमधील बँकांना सुट्टी असणार आहे.
17 सप्टेंबर, 2021: 17 सप्टेंबरला कर्मपुजेनिमित्त केवळ रांचीतील बँकांना सुट्टी असणार आहे.
20 सप्टेंबर, 2021: इंद्रजत्रेनिमित्त गंगटोकमधील बँकांना सुट्टी असेल.
21 सप्टेंबर, 2021: कोची आणि तिरुवनंतपुरमधील बँकांना श्री नारायण गुरू समाधी दिनानिमित्त सुट्टी असणार आहे.
हेही वाचा-उत्तराखंडमध्ये मुसळधार; भूस्खलनामुळे मसूरी-देहरादून महामार्ग बंद
बँका जरी बंद राहिल्या तरी बँकांच्या एटीएम, नेट बँकिंग आणि ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहून बँकिंगची कामे करावी लागणार आहे. दरम्यान, बँकांच्या सुट्टीचे वेळापत्रक हे वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असते.
असे करा बँकांच्या कामांचे नियोजन
- बँकांचे तुम्ही पैसे काढणे किंवा जमा करणे असे आर्थिक व्यवहार तुम्ही नेटबँकिंग द्वारे पूर्ण करू शकता.
- जर रोकड रकमेची आवश्यकता असले तर पुरेशी रक्कम आधीच काढून घेऊ शकता. जेणेकरून बँकांच्या सुट्टी असताना एटीएममध्ये पर्याप्त पैसे नसताना होणारी धावपळ टळू शकते.
- जर तुम्हाला बँकांच्या सुट्टी कालावधीमध्ये रोख पैसे खात्यावर भरायचे असेल, तर काही एटीएमवर तशी सुविधा असते.
हेही वाचा-केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अनादराने बोलणे अस्वीकारार्ह - वर्षा गायकवाड