मुंबई- पुढील ऑक्टोबर महिन्यात बॅंकांना तब्बल २१ दिवस सुट्या राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबरचा संपूर्ण महिना सणांचा असतो. या महिन्यात एकामागून एक सण येतात. ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात काही असेही दिवस येतील जेव्हा बॅंका सलग बंद राहणार.
या दिवशी बॅंका राहणार बंद, वाचा यादी -
* 1 ऑक्टोबर -अर्धवार्षिक बँक खाते बंद केल्याने गंगटोकमध्ये कामावर परिणाम होईल
2 ऑक्टोबर-गांधी जयंतीनिमित्त अगरतळा ते तिरुअनंतपुरम पर्यंत बँका बंद राहतील.
* 3 ऑक्टोबर - रविवार सुटी.
* 6 ऑक्टोबर - आगरतळा, बंगळुरू, कोलकाता येथे महालय अमावस्येमुळे बँका बंद.
* 7 ऑक्टोबर -इम्फाळमध्ये बँका उघडणार नाहीत.
* 9 ऑक्टोबर - शनिवार सुटी.
* 10 ऑक्टोबर - रविवार सुटी.
* 12 ऑक्टोबर - महा सप्तमीमुळे बँका बंद राहतील.
* 13 ऑक्टोबर - महाअष्टमीमुळे आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा, रांची येथे बँक कामगारांची सुटी.
* 14 ऑक्टोबर - अगरतळा,बंगळुरू,चेन्नई,गंगटोक,गुवाहाटी,कानपूर,कोलकाता,रांची,लखनौ,पाटणा,रांची, शिलाँग,तिरुअनंतपुरम येथे महानवमीमुळे बँका बंद.
* 15 ऑक्टोबर- दसऱ्याच्या निमित्ताने अगरतळा,अहमदाबाद ते तिरुअनंतपुरम येथे बँका बंद.
* 16 ऑक्टोबर - गंगटोकमध्ये बँक दुर्गा पूजेला सुटी.
* 17 ऑक्टोबर - रविवार सुटी
* 18 ऑक्टोबर - गुवाहाटीमध्ये काटी बिहूची सुटी.
* 19 ऑक्टोबर-अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथे ईद-ए-मिलादमुळे सुटी
* 20 ऑक्टोबर - अगरतळा, बंगळुरू,चंदीगड,कोलकाता, शिमला येथे वाल्मिकी जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
* 22 ऑक्टोबर - जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुटी असेल.
* 23 ऑक्टोबर - शनिवार सुटी.
*24 ऑक्टोबर - रविवार सुटी.
* 26 ऑक्टोबर -परिग्रहण दिनामुळे जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका उघडणार नाहीत.
* 31 ऑक्टोबर - रविवार सुटी
Conclusion: