हैदराबाद : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणून मार्च महिना ओळखला असतो. वर्षभरातील जमा खर्च सरकारी योजनांचे खर्च या महिन्यात पुर्ण केले जातात. त्यानंतर येणारा महिना म्हणजे एप्रिल महिना नव्या आर्थिक वर्षाचा हा पहिला महिना असतो. या महिन्यात 5 शनिवार आणि 5 रविवार आले आहेत. अनेक राष्ट्रिय स्तरावरील बँकामधे 5 दिवसाचा आठवडा असतो अशा अनेक बँकात या दोन दिवसांत कोणतेही व्यवहार होत नाहीत. तर अनेक बँका या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घेतात. या दिवशी व्यवहार होत नाहीत.
या शिवाय आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आणि जुन्या वर्षाच्या सर्व व्यवहारांच्या हिशोबासाठी दर वर्षी म्हणुन 1 एप्रिल रोजी बँक सुरु असल्या तरी व्यवहार मात्र पुर्णत: बंद असतात. या दिवशी बँका मधे मागिल वर्षातील खाती बंद करणे, शिल्लक पुढे वर्ग करणे, आगामी वर्षासाठी नवी खाती उघडने तसेच लेखा प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या दिवशी सर्व प्रकारच्या म्हणजे राष्ट्रीय, सार्वजनिक, खाजगी तसेच सहकारी क्षेत्रातील बँका पण बंद असतात.
मात्र 1 एप्रिलला शनिवार आला आहे. 4 एप्रिल मंगळवार रोजी महाविर जयंती आहे. या निमित्ताने बँकाना सुट्टी असल्यामुळे या दिवशी व्यवहार होत नाहीत. 7 एप्रिल शुक्रवार रोजी गुड फ्रायडेची सुट्टी आहे. तर 8 एप्रिल ला दुसरा शनिवार आला आहे. त्या नंतर शुक्रवार 14 एप्रिल रोजी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दिवशी बँका बंद असतात तर 22 एप्रिल रोजी चौथा शनिवार आणि इद उल फित्र असल्यामुळे या दिवशीही बँका बंद असणार आहेत. त्यामुळे विविध कारणांमुळे बँका सुमारे 10 ते 15 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
अलीकडे डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत त्यांमुळे बँका बंद असल्यातरी तुमच्या रोजच्या व्यवहारामधे मोठी अडचण निर्माण होत नाही. डिजिटल बँकिंग सुरू असल्यामुळे तुमचे व्यवहार युपीआय, मोबाईल, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून होऊ शकतात पण त्याशिवाय अनेक बाबींसाठी बँकांच्या शाखेत जाण्याची गरज भासते तसेच डिजीटल बँकिंग न करणाऱ्यांना दुसरा पर्याय नसतो त्यासाठी बँकांच्या सुट्या पाहून नियोजन केले तर पुढिल अडचणी कमी होतात.
हेही वाचा : Man in Skirt in Train : भाऊचा नादच खुळा; चक्क स्कर्ट घालून शिरला लोकलमध्ये, 'हे' दिले कारण