ETV Bharat / bharat

Traffic Control With Google : बेंगळुरुचे ट्रॅफिक व्यवस्थापन होणार गुगलच्या मदतीने; कळणार कुठे वाहतूक कोंडी, कुठे काय - बेंगळुरुचे ट्रॅफिक व्यवस्थापन नियोजन

बेंगळुरूमधील ट्रॅफिकचे व्यवस्थापन करण्यासाठी देशात प्रथमच शहरातील वाहतूक पोलिसांनी गुगलशी हातमिळवणी केली आहे. यापुढे वाहन चालकांना वेगमर्यादा आणि वाहतूक कोंडीचे मार्ग गुगल मॅपद्वारेच कळतील. ( Traffic Control With Google )

Traffic Control With Google
बेंगळुरुचे ट्रॅफिक व्यवस्थापन होणार गुगलच्या मदतीने
author img

By

Published : Jul 29, 2022, 8:35 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक) : गार्डन सिटी आणि आयटी सिटी यासह बेंगळुरू हे ट्रॅफिक सिटी म्हणून ओळखल्या ( Traffic Control With Google ) जाते. त्यामुळे बेंगळुरूमधील ट्रॅफिकचे व्यवस्थापन करण्यासाठी देशात प्रथमच शहरातील वाहतूक पोलिसांनी गुगलशी हातमिळवणी केली आहे. यापुढे वाहन चालकांना वेगमर्यादा आणि वाहतूक कोंडीचे मार्ग गुगल मॅपद्वारेच कळतील.

यासाठी होणार उपयुक्त - वाहतुकीची कोंडी असलेले रस्ते आणि बांधकामामुळे वाहतुकीवर निर्बंध असलेले रस्ते यांची माहिती गुगलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे अनावश्यक वाहतूक कोंडी, प्रतीक्षा वेळ, इंधनाचा वापर टाळता येईल.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका - व्यावहारिकदृष्ट्या, शहरातील कात्रिगुप्पे सर्कलमध्ये धावणाऱ्या वाहनांची संख्या आणि त्यांचा वेग यावर आधारित स्वयंचलित सिग्नल बदलण्याचे तंत्रज्ञान गुगलच्या भागीदारीत यापूर्वीच लागू करण्यात आले आहे. बऱ्यापैकी यश मिळाले आहे. येत्या काळात गुगलसोबतचा हा करार आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काम करेल, असे शहर वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त बी.आर. रविकांतेगौडा यांनी सांगितले.

हेही वाचा - Khaman Dhokla Recipe : देशभरात नाश्त्याला खाल्ला जाणारा खमन ढोकळा; व्हिडीओ पाहून रेसिपी नक्की बनवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.