लुधियाना: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) बुधवारी लुधियानातील एका समारंभात उपस्थित होते. मान यांनी वेरका येथे 105 कोटी रुपयांच्या नवीन प्लांटचे उद्घाटन केले. त्यांच्या समारंभात सहभागी होण्यासाठी अनेक गावातील शेतकरीही आले होते. मात्र त्यांच्या या समारंभात काळी पगडी घातलेल्या शेतकर्यांना बंदी घातली गेली होती. (farmers wearing a black turban). पंजाब पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पगड्या केवळ काळ्या रंगामुळे काढायला लावल्या.
आमदाराने मागितली माफी: या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्री भगवंत सिंह मान आणि आम आदमी पक्षाविरोधात संताप आहे. वेरका मिल्क प्लांटच्या कामगारांनाही ज्यांनी काळे फेटे घातले होते त्यांना या समारंभाला उपस्थित राहू दिले गेले नाही. हा कार्यक्रम आमच्यासाठी असताना देखील पोलिसांनी आम्हाला कार्यक्रमात सहभागी होऊ दिले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. झालेल्या प्रकारानंतर आमदार मनविंदर सिंग ग्यासपुरा यांनी शेतकऱ्यांच्या पगड्या उतरवल्याचा मुद्दा मांडला. तसेच काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो, असेही ते म्हणाले.