ETV Bharat / bharat

wrestler protest against federation : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनियाचा डाव; मागे हटणार नसल्याचा पवित्रा - भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या हकालपट्टीसाठी दिग्गज कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात ऑलम्पीकमध्ये पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आदींचा समावेश आहे. आता मागे हटणार नसल्याचे या कुस्तीपटूंनी म्हटले आहे.

wrestler protest against federation
दिग्गज कुस्तीपटूंचे जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलन
author img

By

Published : Jan 18, 2023, 7:54 PM IST

Updated : Jan 18, 2023, 8:03 PM IST

नवी दिल्ली - भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाला हटवण्यासाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने जंतर मंतरवर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूही जंतर मंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना मोठे कष्ट घ्यावे लागतात. मात्र फेडरेशनने खेळाडूंना कमी लेखण्याशिवाय काहीच केले नसल्याचा हल्लाबोल साक्षी मलिकने केला आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात आता खेळाडू एकवटले आहेत.

दिग्गज कुस्तीपटूंचे जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलन

आता मागे हटणार नाही, पुनियाने केले ट्विट : बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाच्या विरोधात ट्विट केले आहे. यात त्याने फेडरेशनचे काम खेळाडूंना साथ देण्याचे असते. मात्र फेडरेशनच अडचणींचा डोंगर उभा करत असेल तर काय करावे, असा सवालही पुनियाने यावेळी केला. आता लढावे लागेल, आम्ही मागे हटणार नसल्याचा पवित्रा बजरंग पुनियाने घेतला आहे. या खेळाडूंनी भारतीय कुस्ती महासंघाविरोधात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर धरणे आंदोलन करत आहेत, याबाबत स्पष्ट केले नाही. मात्र सगळे खेळाडू महासंघाच्या विरोधात तएकवटत आहेत.

कुस्ती महासंघाचे महासचिव खेळाडूशी बोलण्यास तयार : भारतीय कुस्ती महासंघाचे महासचिव विनोद कुमार यांनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणाऱ्या खेळाडूशी बोलण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. बोलून हा प्रश्न सोडवल्या जाऊ शकतो. मात्र खेळाडू बोलण्यास तयार नसल्याचे महासचिव विनोद कुमार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले. आम्ही बजरंग पुनिया याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. खेळाडूंच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्याची तयारीही विनोद कुमार यांनी दर्शवली आहे. मी खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी येते आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जंतरमंतरवर हे खेळाडू बसले आंदोलनाला : दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात खेळाडू धरणे आंदोलनाला बसले आहेत. यामध्ये भारताला ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू धरणे आंदोलनाला बसले आहेत. या खेळाडूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना हटवण्याची मागणी केली आहे. या खेळाडूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अध्यक्षांना हटवल्याशिवाय खेळाडूंनी मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

हे ही वाचा - Rahul Gandhi Remark on Amit Shah: अमित शाहांच्या विरोधात अशोभनीय वक्तव्य.. राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Jan 18, 2023, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.