हैदराबाद - युट्यूबर ब्लॉगरमुळे चर्चेत आलेल्या दिल्लीतील 'बाबा का ढाबा' पुन्हा चर्चेत आला आहे. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना गुरुवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दक्षिण पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर म्हणाले, की कांत प्रसाद यांना अत्यवस्थेत आणण्यात आले होते. त्यांनी दारू पिल्यानंतर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यांच्या मुलाचा जवाबही नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा-आंबा, चक्क २ लाख रुपये किलो.. बागेच्या सुरक्षेसाठी ९ श्वान आणि ६ सुरक्षारक्षक
जिवंत असेपर्यंत ढाबा चालविणार-
कांता प्रसाद हे म्हणाले, की माझ्याजवळ भविष्यासाठी २० लाख रुपये आहेत. मी जिवंत असेपर्यंत ढाबा सुरू ठेवणार आहे. जेव्हा व्यवसाय नुकसानीत येईल, तेव्हा बंद करेन. गेल्या वर्षी मला मिळालेल्या मदतीतून मी माझ्यासाठी व पत्नीसाठी २० लाख रुपये ठेवले आहेत.
हेही वाचा-कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे उत्पादनात 2 लाख कोटींचे नुकसान : आरबीआय लेख
फूड ब्लॉगरमुळे प्रसिद्ध झाले होते कांता प्रसाद-
कोरोनामुळे बर्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांचेही कोरोनाव्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी फूड ब्लॉगर गौरव वासनने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये कांता प्रसाद रडताना दिसत होते. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर हा धाबा चालवणाऱ्या दोन वयोवृद्ध कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
हेही वाचा-डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधात 10 लाख डॉक्टरांचे शुक्रवारी निषेध आंदोलन
कोरोनामुळे रेस्टॉरंट पडले बंद...
बॉलिवूड आणि बर्याच मोठ्या सेलिब्रिटींनीही चांगली रक्कम दान केली. सर्वांच्या मदतीने कांता प्रसाद यांनी स्वतःचे एक नवीन रेस्टॉरंट उघडले. परंतु, कोरोनामुळे, त्याचे हे नवीन रेस्टॉरंट फार काळ टिकू शकले नाही. ग्राहकांची संख्या कमी होत गेली. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर एका वर्षात कांता प्रसाद यांना दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमधील रेस्टॉरंट बंद करुन जुन्या ढाब्यावर परतावे लागले आहे. पैशांवरूनकांता प्रसादचा यू ट्यूबबर गौरव वासनशी वाद झाला होता आणि कांता प्रसाद यांनी गौरवविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. यासंपूर्ण प्रकरणावर कांता प्रसाद यांनी दिलगिरी व्यक्त केली.
गेल्यावर्षी यूट्युबर गौरव वासन याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमुळे ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद रातोरात प्रसिद्ध झाले होते. अनेकांनी मदत केल्याने त्यांची आर्थिक अडचण संपली. मात्र,पैशावरून कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यात वाद झाला होता. कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये गौरव वासनविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आपण चुकीचे वागलो असे कांता प्रसाद यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर यूट्यूबर गौरव वासन यांनी कांता प्रसाद यांची भेट घेतल्यानंतर वादावर पडदा पडला होता.
गौरवने अशी दिली होती प्रतिक्रिया...
कांता प्रसाद यांच्या दिलगिरीबद्दल गौरवने प्रतिक्रिया दिली. बाबांशी आपले कोणतीही वैर नाही. मी त्यांच्यापेक्षा लहान असून वृद्धांचा आदर करतो. मी त्याना कधीच फसवले नाही, असे त्याने सांगितले. अजूनही त्यांना मदत करण्यास मी तयार आहे. कारण, मदत करणे ही काही चुकीची गोष्ट नाही, असेही तो म्हणाला.