ETV Bharat / bharat

Avalanche in Uttarakhand : बद्रीनाथ हायवेजवळ हिमस्खलन, हिमनदी घसरल्याचा व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : Feb 13, 2023, 11:00 AM IST

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पुन्हा एकदा हिमस्खलनाची घटना समोर आली आहे. येथे बद्रीनाथ महामार्गावरील लांबागडजवळ बर्फाचा तुकडा तुटून घसरला आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Etv Bharat
Etv Bharat
हिमनदी घसरल्याचा व्हिडिओ

चमोली (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील लांबागडजवळ हिमनदी घसरल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लांबागड येथील 400 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प बॅरेज साइटचा आहे. व्हिडिओमध्ये एक बर्फाची नदी वाहताना दिसते आहे. या घटनेनंतर येथे काम करणाऱ्या मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला होता, मात्र कुणालाही इजा झाली नाही.

उत्तराखंडच्या डोंगरावर बर्फवृष्टी : सध्या उत्तराखंडच्या डोंगरावर बर्फवृष्टी होत आहे. याशिवाय ग्लेशियर सरकण्याची प्रक्रियाही सुरू आहे. अलीकडेच भारत-चीन सीमेवर असलेल्या मलारी गावाजवळ कुंती नाल्यात हिमस्खलन झाले होते. यामध्ये ग्लेशियर तुटून कुंती नाल्यात विलीन होताना दिसत होते. या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे जोशीमठच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. जोशीमठमध्ये तडे आणि दरड कोसळण्याच्या घटना आधीच घडत आहेत. भूस्खलनग्रस्त जोशीमठच्या पुढे मलारी भागात हे हिमस्खलन झाले होते. यापूर्वी हिमस्खलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.

या आधीही हिमस्खलन झाले होते : आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे एक प्रचंड हिमनदी हलताना दिसत आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याजवळ जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथील मजूरांनी स्वतः या घटनेचा व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. राज्यात असा प्रकार यापूर्वीही घडला आहे. बद्रीनाथ महामार्गावर तीन ग्लेशियर पॉइंट देखील आहेत, जिथे दरवर्षी हिमस्खलन होत असते. एप्रिल 2021 मध्येही चमोलीच्या सुमना येथील बीआरओच्या लेबर कॅम्पवर भीषण हिमस्खलन झाले होते, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.

औलीमध्ये बर्फवृष्टी : उत्तराखंडमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी कमी पाऊस आणि बर्फवृष्टी झाली आहे. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि स्नो स्पोर्ट्स सेंटर असलेल्या औली येथे गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. ही बर्फवृष्टी आगामी राष्ट्रीय स्कीइंग चॅम्पियनशिपसाठी दिलासा देणारी आहे. औलीमध्ये सध्या 1 फुटांपेक्षा जास्त बर्फ साचला आहे. औली येथे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय वरिष्ठ आणि ज्युनियर अल्पाइन स्की आणि स्नोबोर्ड चॅम्पियनशिपची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत होणार होती. मात्र जोशीमठ वाद आणि पुरेशा बर्फवृष्टीअभावी खेळांची तारीख वाढवण्यात आली

हेही वाचा : Earthquake In Sikkim : सिक्कीममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.3 एवढी तीव्रता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.