कोझिकोड (केरळ) : केरळच्या कोझिकोड येथे आईस्क्रीम खाल्ल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आता हा मृत्यू म्हणजे खून असल्याचे म्हटले आहे. अहमद हसन रिफाई (12) या मूळच्या अरिकुलम येथील मुलाचा सोमवारी कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकरणी कोयलंडी पोलिसांनी त्याची आत्या ताहिरा (38) हिला अटक केली आहे.
मुलाच्या आईला मारण्याचा कट होता : या 12 वर्षीय मुलाचा विषारी आईस्क्रीम सेवन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अरिकुलम येथील दुकानातून विकत घेतलेल्या आईस्क्रीममध्ये हे विष मिसळले होते. चौकशीदरम्यान ताहिराने कबूल केले की, आईस्क्रीममध्ये मिसळलेले विष मुलाच्या आईसाठी होते. मात्र ती घरी नसल्यामुळे मुलाने ते आईस्क्रीम खाऊन टाकले. ही दोन्ही कुटुंबे आजूबाजूच्या घरात राहतात. ताहिरा काही मानसिक आजारानेही त्रस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मुलाचा दवाखान्यात मृत्यू झाला : या मुलाने रविवारी विषारी आईस्क्रीम खाल्ले होते. त्यानंतर त्याला उलट्या सुरु झाल्या. त्याने मुथांबी आणि मेपायुर येथील क्लिनिकमध्ये उपचार घेतले. पण तो काही बरा झाला नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी त्याला कोयलंडी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळाने त्याला कालिकत मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
वैयक्तिक वैमनस्यातून हत्येचा प्रयत्न : मुलाचा मृतदेह कालिकत मेडिकल कॉलेजमध्ये आणल्यानंतर कोयलंडी पोलिसांनी या प्रकरमी चौकशी सुरु केली. पोलिसांनी आरोग्य विभाग, अन्न सुरक्षा विभाग, पोलिस आणि फॉरेन्सिक विभागाने ज्या दुकानातून आईस्क्रीम विकत घेतले होते, त्या दुकानातून नमुने घेऊन त्याची चाचणी केली. परीक्षेच्या काळात दुकान बंद होते. पण पोस्टमॉर्टममध्ये शरीरात अमोनियम फॉस्फरसचे अंश आढळून आले. या अहवालावरून कोयलंडी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस गेल्या तीन दिवसांपासून सतत चौकशी करत होते. त्यानंतर पोलिसांचा तपास ताहिरावर येऊन संपला. वैयक्तिक वैमनस्यातून तिने मुलाच्या आईला मारण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. कालिकत ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख आर. कारुपासामी यांच्या नेतृत्वाखाली डीवायएसपी आर. हरिप्रसाद, सीआय के.सी. सुभाष बाबू आणि इतरांचा या तपास पथकात समावेश होता.
हेही वाचा : Karnataka Election 2023 : तडीपार नेत्याला काँग्रेसचे तिकीट; जिल्हाबंदीमुळे नंतर तिकीट दिले बायकोला