झाशी - झाशीतील मिशन चौकामध्ये सोमवारी एकतर्फी प्रेमातून ( One sided love affair ) एका तरुणाने विद्यार्थिनीवर ब्लेडने हल्ला ( attack on girl in jhansi ) केला. जखमी विद्यार्थिनीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्या मुलीच्या चेहऱ्याला झालेली जखम गंभीर असून डॉक्टरांनी 31 टाके टाकले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.
ग्वाल्हेरची रहिवासी - ही विद्यार्थिनी ग्वाल्हेर रोड येथील रहिवासी आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी मिशन चौकाजवळ इंग्रजीच्या कोचिंग क्लासला जाण्यासाठी निघाली होती. ती जात असलेल्या वाटेत दानिश खान ( Danish Khan ) हा तरुण उभा होता. अचानक त्याने त्याने तिच्या मानेवर, चेहऱ्यावर ब्लेडने वार केले. या विद्यार्थिनीवर हल्ला झाल्याचे पाहून तिथे उभी असलेली मदतीला धावली. तिने या मुलीला वाचविले, परंतु तोपर्यंत हल्ला झालेली विद्यार्थिनी रक्तबंबाळ झाली होती. त्याच अवस्थेत ती जिवाच्या आकांताने कोचिंग क्लासवर पोहोचली. शिक्षकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. तिच्या आईने सांगितले की, दानिश गेल्या दोन वर्षांपासून मुलीचा छळ करीत होता. त्याने आपल्या मुलीचा फोन नंबर कोचिंगमधून मिळविला आणि तो वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून मैत्री करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता.
मुलीच्या आईने सांगितले की, कोचिंगला जाताना तो रोज तिचा पाठलाग करायचा, विनयभंग करायचा आणि धमक्याही देत असे. भीतीमुळे मुलीने घरातील कोणालाही काहीही सांगितले नव्हते. मुलीने त्याच्याशी बोलण्यास, मैत्री करण्यास नकार दिल्याने त्याने आपल्या मुलीवर हल्ला केला. दानिश हा पीडितेपेक्षा 8 ते 10 वर्षांनी मोठा आहे. मुलीचे वडील नाहीत. तीन बहिणींमध्ये ती सर्वात लहान असून तिला एक भाऊही आहे. सध्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची विद्यार्थिनीसोबत मैत्री होती आणि दोघेही फोनवर बोलत असत. पोलिस या घटनेचा तपास करीत असून आरोपी दानिशचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - Father Murdered : अर्धांगवायू झालेल्या वडिलांना बेदम मारहाण करत मुलाने घेतला जीव