प्रयागराज (उत्तरप्रदेश): बाहुबली अतिक अहमदचा मुलगा असद याला गुरुवारी एसटीएफने चकमकीत ठार केले. त्याच्यासोबत शूटर गुलामलाही टीमने मारले. दोघांचेही मृतदेह झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. कुटुंबीय असदचा मृतदेह घेऊन झाशीला येणार आहेत. मात्र, शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कुटुंबातील एकही सदस्य पोहोचला नव्हता. असद याचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळी पोहोचण्याची शक्यता असून, मृतदेहासाठी शवपेटी मागवण्यात आली आहे. स्मशानभूमीत कबर खोदण्याचे काम सुरू असून, सायंकाळी मृतदेह ताब्यात दिला जाईल.
आजोबांच्या कबरीजवळ करणार दफन: अतिक अहमद यांचा तिसरा मुलगा असद याच्या पार्थिवावर त्यांच्या कुटुंबीयांच्या स्मशानभूमीत दफन करण्यात येणार आहे. त्यासाठी कासारी मासारी परिसरातील स्मशानभूमीत कबरी खोदण्याचे काम सुरू झाले आहे. असदची कबर 4 मजुरांच्या मदतीने खोदली जात आहे.अतीक अहमदचे वडील हाजी फिरोज अहमद यांच्या कबरीजवळ असदला दफन करण्यात येणार आहे.
कासारी मासारी भागातील या स्मशानभूमीत अतिकच्या पूर्वजांची कबरही बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या समितीनेच कबरी खोदण्याचे काम सुरू केले आहे. यासोबतच अतिकच्या तुटलेल्या घराबाहेर अंत्ययात्रा काढण्याचीही तयारी सुरू आहे. अतिक अहमद यांच्या वडिलोपार्जित घराबाहेर काही खुर्च्या ठेवण्यात आल्या असून तेथे काही लोक ये-जा करत आहेत. मात्र, अतिक अहमद यांच्या कुटुंबातील एकही सदस्य घर आणि स्मशानभूमीत गेला नाही. मृतदेह आल्यानंतर अतिकच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील, असे शेजारी राहणारे लोक सांगतात.
दोघांचेही मृतदेह आज प्रयागराज येथे आणण्यात येणार आहेत. अतिक अहमद अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. असदला वाचवण्यासाठी अतिकने अबू सालेमची मदत घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अबू सालेमने असदला पुण्यात राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. उमेश पाल हत्येप्रकरणी शुक्रवारी पुन्हा एकदा पोलीस अतिक अहमद आणि अशरफ यांची चौकशी करत आहेत. एटीएसचे पथक चौकशीसाठी प्रयागराजला पोहोचले आहे.
हेही वाचा: जम्मू काश्मिरातल्या चिमुकलीने केला मोदींसाठी व्हिडीओ