प्रयागराज (उत्तर प्रदेश) : बाहुबली माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची शनिवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली. तेव्हापासून अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन आणि अशरफची पत्नी झैनब फातिमा यांच्या आत्मसमर्पणाच्या चर्चेला वेग आला आहे.
पोलिसांनी कोर्ट आणि परिसरात बंदोबस्त वाढवला : शाइस्ता परवीनच्या आत्मसमर्पणाची शक्यता पाहता पोलिसांनी कोर्ट आणि परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. न्यायालयाभोवती एलआययू देखील तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यावर बारीक नजर ठेवली जात आहे. प्रयागराजच्या तीनपैकी कोणत्याही एका पोलिस ठाण्यात शाइस्ता परवीन आत्मसमर्पण करू शकते अशी चर्चा आहे. यामध्ये धुमनगंज पोलीस ठाणे, खुलदाबाद पोलीस ठाणे आणि पुरमुफ्ती पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
शाइस्ता परवीनवर 50 हजार रुपयांचे बक्षीस आहे : अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आहे. तिच्यावर पोलिसांनी 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. तेव्हापासून शाइस्ता परवीन फरार आहे. मुलगा असदच्या मृत्यूनंतर शाइस्ता परवीनच्या आत्मसमर्पणाच्या चर्चेला वेग आला आहे. असदच्या पर्दा - ए - खाक दरम्यान बुरखा घातलेल्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र तो फोटो शाइस्ता परवीनचाच होता की नाही, याची पुष्टी होऊ शकली नाही. काल रात्री उशिरा अतिक अहमद आणि अशरफ या दोघांची तीन मारेकऱ्यांनी हत्या केली. तेव्हापासून शाइस्ता परवीनच्या आत्मसमर्पणाच्या चर्चेला वेग आला आहे.
शाइस्ता परवीनच्या आत्मसमर्पणाची चर्चा : शाइस्ता परवीन रविवारी अशरफची पत्नी झैनाब फातिमासह विशेष रिमांड दंडाधिकारी नरेंद्र कुमार यांच्या न्यायालयात आत्मसमर्पण करू शकते, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तिथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि एलआययू तैनात करण्यात आले आहे. यासोबतच महिला पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. बुरखा घातलेल्या महिलांवरही नजर ठेवली जात आहे.
हे ही वाचा : Atiq Ashraf Murder Case : अतिकच्या हत्येची बातमी समजताच मुलगा उमर लखनौ तुरुंगात पडला बेशुद्ध; रुग्णालयात दाखल