ETV Bharat / bharat

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; जनसभेस 1000 तर घरोघरी प्रचाराला 20 लोकांना परवानगी - भारतीय निवडणूक आयोगाचे नवे नियम

भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता घरोघरी जाऊन प्रचारासाठी 10 ऐवजी 20 जणांना परवानगी तर इनडोअर मीटिंगमध्ये 300 ऐवजी 500 लोक उपस्थित राहू शकतात.

Election Commission
भारतीय निवडणूक आयोग
author img

By

Published : Jan 31, 2022, 5:36 PM IST

नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections) पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता घरोघरी जाऊन प्रचारासाठी 10 ऐवजी 20 जणांना परवानगी तर इनडोअर मीटिंगमध्ये 300 ऐवजी 500 लोक उपस्थित राहू शकतात.

कोरोनाचा प्रादृभाव पाहता आयोगाने 22 जानेवारी रोजी रॅली आणि रोड शोवरील बंदी ( EC Extends Ban on Roadshows ) 31 जानेवारीपर्यंत वाढवली होती. आढावा बैठकीनंतर आयोगाने निवडणूक रॅलींवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. सत्तेत येण्यासाठी सर्वंच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. पण, सर्वांचे लक्ष यूपी निवडणूक 2022 च्या निकालाकडे लागले आहे. उत्तर प्रदेशातून लोकसभेत सर्वाधिक खासदार जातात.

2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीसाठी 30 स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशिवाय यूपी प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांचा समावेश आहे.

याशिवाय समाजवादी पक्षाच्या 30 स्टार प्रचारकांच्या यादीत सपाचे संरक्षक आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचीही नावे आहेत. याशिवाय, भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Union Budget 2022 : कसा तयार होतो दर वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प? जाणून घ्या विशेष लेखात...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.