ETV Bharat / bharat

सीमा विवाद : मिझोरम पोलिसांकडून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्माविरोधात FIR - Assam Chief Minister Himanta Biswa Sarma

मिझोरमच्या पोलिसांनी हिंसा प्रकरणात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, राज्य पोलीस दलातील चार अधिकारी आणि अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Assam Chief Minister Himanta Biswa Sarm
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा
author img

By

Published : Jul 31, 2021, 7:20 AM IST

ऐझॉल - हिंसाचार उफाळल्याने आसाम-मिझोरम सीमेवरील तणाव आणखीच वाढला आहे. मिझोरमच्या पोलिसांनी कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगते नगरात झालेल्या हिंसा प्रकरणात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, राज्य पोलीस दलातील चार अधिकारी आणि अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आसामच्या 200 अज्ञात पोलीस कर्मचऱयांविरोधात खटला दाखल केला आहे. तर आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या एका राज्यसभा सदस्याला आणि अन्य सहा जणांना नोटीस बजावली आहे.

गेल्या सोमवारी वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर हिंसाचार भडकला होता. आसाममधील कछार जिल्हा आणि मिझोरम कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 6 जवान ठार झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन घटनेची संपूर्ण माहिती घेतली. दोन्ही राज्यांनी सीमावादावर शांतीने मार्ग काढण्याचे गृहमंत्र्यांनी आवाहन केले.

आसाम सरकारने मिझोरमबरोबरील सीमा वादानंतर तीन दिवस राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. सीमावादात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची आसाम सरकारने घोषणा केली आहे. तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहे.

अमित शाह टीकचे धनी -

आसाममध्ये भाजपचं सरकार आहे. तर मिझोरममध्ये भाजपाप्रणित ईशान्य लोकशाही आघाडीत सहभागी असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटचं (MNF) सरकार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या दोन हिंसाचार भडकल्याप्रकरणी विरोधकांनी शाह यांना लक्ष्य केले आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर लगेचच इतकी मोठी घटना कशी घडली?' असा सवाल 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी यांनी उपस्थित केला. तर ही घटना म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांचं अपयश असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

सीमा विवाद -

आसामच्या बराक खोऱ्यातील कछार, करीमगंज, हेलाकांडी जिल्हे आणि मिझोरमचे तीन ऐझॉल , कोलासिब आणि मामित या जिल्ह्यांची 164 किलोमीटर लांब सीमा एकमेकांना जोडून आहे. या अगोदर ऑगस्ट 2020 मध्ये आणि फेब्रुवारी 2021 मध्येही या आंतरराज्यीय सीमेवर हिंसाचार घडल्याचं समोर आलं होतं. दोन्ही राज्यातील सीमा विवाद ब्रिटिश काळापासून म्हणजेच गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे. तेव्हा मिझोरम हा आसामच्या लुशाई हिल्सचा भाग मानला जायचा.

हेही वाचा - सीमावादाच्या घटनेनंतर आसामने जाहीर केला राजकीय दुखवटा; मृताच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.