ETV Bharat / bharat

jihadi Education In Madrassa : मदरशात दिले जाणारे जिहादी शिक्षण हे मोठे आव्हान - आसाम पोलीस महासंचालक - अन्सारुल्ला बांग्ला टीम

आसाम पोलीस महासंचालकांनी मदरशात दिले जाणारे जिहादी शिक्षण हे भारतासोमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगितल्याचे वक्तव्य केले आहे. मदरशांतील काही शिक्षक हे इस्लामी शिक्षण सोडून जिहादी शिक्षण देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आसाम पोलिसांनी अल कायदा आणि अन्सारुल्ला बांग्ला टीम या संघटनांचे 52 आरोपी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Assam DGP On jihadi Education In Madrassas
पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंतो
author img

By

Published : Jan 28, 2023, 7:45 PM IST

गुवाहाटी - मदरशात देण्यात येणाऱ्या जिहादी शिक्षणामुळे भारतासमोर मोठे आव्हान निर्माण झाल्याचा दावा आसामच्या पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंतो यांनी केले. मदरशातून इस्लामी शिक्षण देण्याऐवजी अनेक शिक्षक जिहादी शिक्षण देत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मदरशांमधून अन्सार अल बांग्ला टीम आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आरोपींना अटक केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे मदरशांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

52 जणांच्या आवळल्या मुसक्या : मदरशात काही शिक्षक हे इस्लामीक शिक्षणाऐवजी जिहादी शिक्षण देतात. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होत आहे. काही मदरशांमधून अन्सार अल बांग्ला टीम आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 52 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यापैकी 9 आरोपींवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आता मदरशांची गरज नाही : मदरशांमधून इस्लामीक शिक्षणाऐवजी जिहादी शिक्षण देण्यात येते. त्यामुळे यापुढे मोठ्या प्रमाणात मदरसे उभारण्याची गरज नसल्याचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योची महंतो यांनी यावेळी स्पष्ट केले. 50 पेक्षा कमी विद्यार्थी असलेले मदरसे बंद करण्यात यावे. नाहीतर त्यांचे मोठ्या मदरशात विलीनिकरण करावे. यापुढे सरकारी जमिनीवर कोणताही मदरसा स्थापन करण्यास विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मदरशांची सगळी माहिती राहण्यासाठी त्यांच्या व्यवस्थापनासाठी मंडळ स्थापन करण्याची मागणीही पोलीस महासंचालकांनी यावेळी केली.

तर बॉम्ब फुटतील : प्रत्येक मदरसा बोर्डाने नियम बनवून त्यांचे पालन केले पाहिजे. अधिकार नसतानाही मदरसे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. ते जर असेच अनियंत्रीतपणे चालु राहिले तर कधी चकमकी होऊन बॉम्ब फुटतील. त्यामुळे हिंदू-मुस्लिमांध्ये संघर्ष होईल अशी भीतीही पोलीस महासंचालकांनी यावेळी व्यक्त केली. हा प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस महासंचालकांनी आसाममधील मदरशांच्या व्यवस्थापन समित्यांची आसाम पोलीस मुख्यालयात अनेकदा बैठकही घेतल्याचे ते यावेळी म्हणाले.

देशविरोधी कारवाया : पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंतो यांनी आम्ही मदरशांना जमिनीच्या कागदपत्रांशिवाय काम करू देणार नसल्याचे सांगितले. आम्ही मुस्लिम समाजाला कोणताही आदेश दिलेला नाही असेही ते म्हणाले. आसाम पोलिसांनी राज्यात मदरसे चालवणाऱ्या चार प्रमुख इस्लामिक संघटनांना आमंत्रित केले आहे. यात जमियत उलेमा-ए-हिंद, नदवतु तामीर, अहले हदीश आणि अहले सुन्नत या संघटनांचा समावेश आहे. या संघटनांच्या प्रमुखांना पोलीस मुख्यालयात चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. या संघटनांनी मंडळाद्वारे या संस्था चालवण्यासाठी नवीन प्रणाली अवलंबण्यास सहमती दर्शविली असल्याचेही महासंचालक यावेळी म्हणाले. काही माणसे दुर्गम ठिकाणी मदरसा स्थापन करतात. त्यानंतर ते स्थानिक एजंटामार्फत एखाद्या मुलीशी लग्न करतात. लग्नानंतर देशविरोधी कारवाया करुन गायब होतात. त्यामुळे अशी माणसे मौलाना नाही, तर सैतान असतात. हा ट्रेंड सध्या राज्यात सुरू असल्याचेही पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंतो यांनी यावेळी सांगितले.

मदरशांमधून नेटवर्क : आसाम पोलिसांनी अन्सारुल्ला बांग्ला टीम (ABT) च्या नऊ मॉड्यूल्सचा पर्दाफाश केल्याची माहिती पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंतो यांनी दिली. मदरशांमधून नेटवर्क तयार करणाऱ्या अन्सारुल बांगला टीम आणि अल कायदाशी संबंधित 52 जणांना पोलिसांनी अटक केल्याचेही ते यावेळी म्हणाले. आसाम पोलीस कोणत्याही देशविरोधी कारवाया सहन करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावले. या कारवायात मुस्लिम असो की हिंदू पोलीस आपली कारवाई कायद्यानुसार पार पाडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कौशल्य विकासाचा समावेश करा : मुस्लिम समाज आणि राज्यातील मौलानांनी त्यांच्या मदरशांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचे आवाहन पोलीस महासंचालकांनी केले. गोलपारा पोलिस ठाण्यातील सभेला संबोधित करताना त्यांनी अरबी भाषासह संगणक शिक्षण, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन आदी व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण देण्याची विनंती केली. त्यामुळे मदरशांमध्ये अनेक सुधारणा होतील. त्या दिशेने आम्ही वाटचाल करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Prakash Ambedkar On ED CBI : ईडी सीबीआयच्या भीतीने 7 लाख 65 हजार व्यावसायिकांनी सोडला देश - प्रकश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.