ETV Bharat / bharat

Himanta Biswa Ram Madhav : मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतली?, हेमंता बिस्वा, राम माधव यांच्यावर गंभीर आरोप - मणिपूर निवडणूक

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा आणि भाजप नेते राम माधव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या नेत्यांनी मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतल्याचा खुलासा एका उग्रवादी गटाच्या नेत्याने केला आहे.

Himanta Biswa Ram Madhav
हेमंता बिस्वा सरमा राम माधव
author img

By

Published : Jun 14, 2023, 3:47 PM IST

गुवाहाटी (आसाम) : आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा आणि वाद यांचे जुने नाते आहे. आता त्यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. हेमंता बिस्वा सरमा आणि भाजप नेते राम माधव यांनी मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मणिपूरमधील एका उग्रवादी गटाच्या नेत्याने 2019 मध्ये लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे.

  • . @IndiaToday expose’ on BJP CM Himanta Biswa Sarma & its Former National General Secretary Ram Madhav is truly disturbing and depicts an unpardonable compromise with National Security, if assertions are proved.

    But the more important QUESTION👇

    ▪️Did BJP take assistance of… pic.twitter.com/xwEABXiwDk

    — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप आणि उग्रवाद्यांमध्ये करार झाल्याचा दावा : या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा आणि भाजपचे जेष्ठ नेते राम माधव यांनी निवडणुकीपूर्वी उग्रवाद्यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. या बैठकीत भाजप आणि उग्रवाद्यांमध्ये सामंजस्य करार झाला होता. या करारात जहालवादी संघटना भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी मदत करतील, असे म्हटले होते. युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष एसएस हाओकीप यांनी हे पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा भाग आहे. हे पत्र त्यांनी 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिले होते.

एन बिरेन सिंह उग्रवाद्यांच्या मदतीने मुख्यमंत्री झाले : दहशतवादी गटाच्या नेत्याने पत्रात म्हटले आहे की, भाजपचे एन बिरेन सिंह 2017 मध्ये कुकी जहालवाद्यांच्या मदतीने मणिपूरचे मुख्यमंत्री झाले. मणिपूरमधील कुकी बंडखोर गटाच्या नेत्याने 2019 मध्ये एका पत्राद्वारे गृहमंत्री अमित शहा यांना या घटनेची माहिती दिली होती. युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष एसएस हाओकीप यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत हे स्फोटक पत्र जोडले आहे. एसएस हाओकीप यांना एनआयएने 2018 मध्ये अटक केली होती.

'लोकसभा निवडणुकीतही फायदा मिळवला' : मणिपूरमध्ये भाजपचे सरकार बनवण्यात आमची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा या नेत्याने पत्राद्वारे केला आहे. आमच्या पाठिंब्याशिवाय भाजपला मणिपूरमध्ये सरकार स्थापन करणे अशक्य झाले असते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आमच्या भागात भाजपला 80-90 टक्के मते मिळाली, असे पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा :

  1. Amit Shah On Manipur : मणिपूर हिंसाचाराची निवृत्त न्यायाधिशांच्या समितीकडून होणार चौकशी; उद्यापासून कोम्बींग ऑपरेशन - अमित शाह
  2. Manipur violence : मणिपूरमधील चर्चमध्ये हल्लेखोरांचा गोळीबार; 9 ठार, 15 जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.