ETV Bharat / bharat

IND vs PAK Asia Cup 2023 Super 4 LIVE : भारत-पाकिस्ताना सामना पावसामुळं रद्द झाल्यानं प्रेक्षकांची निराशा, उर्वरित सामना उद्या होणार

IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक 2023 च्या सुपर 4 टप्प्यातील सामना पावसामुळं रद्द करण्यात आलाय. भारत, पाकिस्तान आशिया चषक सामना आज कोलंबोमध्ये खेळला जात होता. या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकला होता. तर भारतानं प्रथम फलांदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Asia Cup 2023
Asia Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 3:10 PM IST

Updated : Sep 10, 2023, 9:11 PM IST

कोलंबो (श्रीलंका) IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ फेरीतला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला आहे. उर्वरित सामना उद्या पुन्हा खेळवला जाईल. कोलंबोत गेल्या अनेक दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं भारत-पाकिस्तान रद्द करण्यात आलाय.

IND vs PAK Live Updates: 25 व्या ओवरमध्ये पावसामुळं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना थांबलाय. 24.1 ओवरनंतर भारताची धावसंख्या (147/2) आहे. केएल राहुल (17), विराट कोहली (8) धावा करून नाबाद आहेत.

IND vs PAK Live Updates: 18 व्या षटकात भारताची दुसरी विकेट पडलीय. 18 व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं शुबगन गिलला आगा सलमानच्या हातून झेलबाद केलं. शुबगन गिल 58 धावां केल्या आहेत.

IND vs PAK Live Updates: भारताला पहिला धक्का 17 व्या षटकात बसलाय. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खाननं शानदार फलंदाजी करणाऱ्या भारतीय कर्णधार रोहित शर्माला 17 व्या षटकात आऊट केलंय. कर्णधार रोहित शर्मा 56 धावा करत फहीम अश्रफच्या हाती झेलबाद झाला.

आशिया चषक 2023 : भारताकडून रोहित शर्मा, शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं पहिलं षटक टाकलं. रोहितने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकून संघाचं खातं उघडलं. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या (6/0)

भारत-पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना : क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी भारत, पाकिस्तान यांच्यात आज दुसरा समाना होत आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत पाकिस्तान सामना खेळला जात आसून पाकिस्ताननं टाॅस जिकंला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस : विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी सामन्यांमध्ये पावसाचा अडथळा आला होता. आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) आशिया चषक 2023 च्या सुपर चार टप्प्यातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केला होता.

बांगलादेशचा 21 धावांनी पराभव : कालच्या सामन्यात श्रीलंकेनं आशिया कप स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये बांगलादेशचा 21 धावांनी पराभव केला होता. श्रीलंकेचा खेळाडू सदीरा समरविक्रमाने 93 धावा केल्या होत्या. संघानं 50 षटकांत 257/9 धावा करत विजय मिळवला होता. श्रीलंलंकन संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेशनं चांगली सुरुवात केली होती. बांगलादेशाच्या तौहीद हृदोयनं 97 चेंडूत 82 धावा ठोकल्या होत्या. पण लागोपाठ तीन विकेट्स गमावल्यानं अखेर संघाचा पराभव झाला होता.

हेही वाचा -

  1. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : राहुल की इशान, कोणाला मिळणार संधी; जाणून घ्या आकडे काय सांगतात
  2. Shubhman Gill on Pakistan Pace Attack : पाकिस्तानी गोलंदाजीवर आपण का अडखळतो? शुभमन गिलनं सांगितलं धक्कादायक कारण
  3. Ojas Deotale Interview : ओजसनं बर्लिनमध्ये घेतला 'सुवर्णवेध', जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वल; आता ऑलम्पिकमधील सुवर्णपदकावर 'लक्ष्य'

Last Updated : Sep 10, 2023, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.