ETV Bharat / bharat

गाड्या भरून पैसे घेऊन पळाले अशरफ गनी, रशियाचा खळबळजनक दावा - russian government

तालिबानने त्यांना रक्कम मिळाल्याचा दावा केला असून याबाबत अधिकृत स्पष्टता मिळाली नाही. ही रक्कम 5 दशलक्ष रुपये असल्याचे समजते. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यावर राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन कझाकस्तानला गेले होते.

ashraf gani
ashraf gani
author img

By

Published : Aug 17, 2021, 9:51 AM IST

Updated : Aug 17, 2021, 1:50 PM IST

काबूल - अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना रिकाम्या हाताने गेले नसून 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन गेल्याचा धक्कादायक दावा रशियाच्या दूतावासाने केला आहे. रशियाची वृत्तसंस्था RIA ने दूतावासातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली. पैसे जास्त असल्याने काही रक्कम ते विमानतळावरच सोडून गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तालिबानने त्यांना रक्कम मिळाल्याचा दावा केला असून याबाबत अधिकृत स्पष्टता मिळाली नाही. ही रक्कम 5 दशलक्ष रुपये असल्याचे समजते. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यावर राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन कझाकस्तानला गेले होते. मात्र, आता सध्या ते कुठे आहेत याचा नेमके ठिकाण कोणालाच माहिली नाही. येथे राहिल्यास संघर्ष झाला असता म्हणून आपण देश सोडण्याचे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

रशिया दूतावास सुरूच राहणार

तालिबानच्या कब्जानंतर अनेक देशांनी आपले दूतावास खाली केले आहेत. तेथील अधिकाऱ्यांना परत देशात बोलावले आहे. या परिस्थितीत रशियन दूतावासाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रशियाचा जुना शत्रू असला तरीही त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा रशिया प्रयत्न करेल. यावर रशियाचे अफगाणिस्तान प्रकरणांशी संबंधित सल्लागार झामीर काबुलोव्ह यांनी काही पैसे ते सोडून जातील असेही उपहासात्मक बोलले आहे.

120 भारतीयांना आणले सुरक्षित

सोमवारी रात्री भारताचे C-70 हे विमान 120 भारतीयांना घेऊन परत आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच अफगाणिस्तानचे काही खासदार आणि उच्चायुक्त सुद्धा भारतात पोहोचले. तेथे अडकलेल्या भारतीयांनी एक व्हीडीयो जारी केला आहे. यात एका कोपऱ्यात बसून तेथील भारतीय नागरिक अडचणीत आहेत. याआधी 129 भारतीयांना परत आणले आहे. "माझ्यासोबतच आणखी भारतीय आहेत. आम्ही बाहेर निघू शकत नाही. कारण, बाहेर गोळ्या झाडल्या जात आहेत. येथे चोर आणि लुटारूंची भीती आहे. भारताचे विमान कधी येणार आम्हाला काहीच पत्ता नाही. आम्हाला आधी दुपारी 12.30 ची वेळ देण्यात आली होती. आता दूतावासात कुणी फोन देखील उचलत नाही. आमच्याकडे कसलीही माहिती नाही. विमानतळाबाहेर 4 लाख लोक उभे आहेत. प्लीज आमची मदत करा अशा आशयाचा संदेश सोशल मिडीयावर टाकला आहे.

लष्कराला बोलवण्याचा निर्णय योग्य

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर निर्माण झाली, अशी कबुलीही बायडेन यांनी दिली. व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचं सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचं हे पहिलं भाषण होतं. बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अफगाणी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली आणि देश सोडून पळून गेल्याचं मत बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा - काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू

Last Updated : Aug 17, 2021, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.