अमरावती ( आंध्रप्रदेश ) : चक्रीवादळ असानीने बुधवारी रात्री उशिरा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडक दिली आहे. धडकेनंतर हे चक्रीवादळ कमकुवत झाले ( WEAKENS INTO DEEP DEPRESSION ) असून, अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली ( ASANI MAKES LANDFALL IN COASTAL ANDHRA PRADESH ) असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली.
असानी चक्रीवादळ आता आणखीन कमकुवत होत आहे. त्यानंतर ते बंगालच्या उपसागरात जाईल अशी माहिती SDMA संचालक बीआर आंबेडकर यांनी दिली. तथापि, किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल आणि ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहतील, असे ते म्हणाले. "लोकांनी सावध राहावे आणि मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये कारण बंगालचा उपसागर उसळलेला राहील," असे आंबेडकर पुढे म्हणाले.
बुधवारी संध्याकाळी, असानी चक्रीवादळ हे कृष्णा जिल्ह्यातील मछलीपट्टनम किनारपट्टीपासून सुमारे 20-30 किमी अंतरावर होते. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगतच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आसनीच्या प्रभावाखाली मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तर सरकारी यंत्रणा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे.