नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून परिस्थती अत्यंत वाईट झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. यातच कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण गरजेचे असताना अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महलातून बाहेर यावं आणि देशातील नागरिकांची दशा पाहावी, अशी खोचक टीका केली.
एआयएमआयएम सुप्रीमो आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विट पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) टॅग करत मोदींवर हल्लाबोल केला. “खोटे, खोटे आणि खोटे. मोदी सरकार खोटारडेपणावर आधारलेलं आहे. पंतप्रधानांनी ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडावं. महालातून बाहेर येऊन देशातील गरीबांची काय दशा झालीयं हे पाहाव, असे टि्वट असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.
मोदी हे देशापेक्षा मोठे नाहीत. मोदी देशाच्या बरोबरीत एका अनुप्रमाणेही नाहीत. कोरोना संकटात मुले अनाथ झाली आहेत. याला जबाबदार मोदी सरकार आहे, असेही औवेसी म्हणाले. यापूर्वी सुप्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी वैज्ञानिकांच्या सल्लागार गटाच्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा ओवैसी यांनी केंद्रावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैज्ञानिक ज्ञानांची किंमत देश मोजतोय, असे ते म्हणाले होते.
देशातील लसीकरण -
भारतात कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना लसीचे आतापर्यंत 20,89,02,445 डोस देण्यात आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 30,62,747 डोस लोकांना देण्यात आले आहेत.