ETV Bharat / bharat

Asaduddin Owaisi Attack On Nitish Kumar : दलित अधिकाऱ्याच्या खुन्याला सोडल्याचे सांगणार का, नितीश कुमारांना ओवेसींचा सवाल - Asaduddin Owaisi Attack On CM Nitish Kumar

बिहारमधील नेते आनंद मोहन यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. आनंद मोहन यांच्या सुटकेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही आनंद मोहनच्या सुटकेवरुन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

Asaduddin Owaisi Attack On Nitish Kumar
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 28, 2023, 10:14 AM IST

एमआयएमचे नेत असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद : माजी खासदार तथा जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या हत्येचा दोषी आनंद मोहनच्या सुटकेवरून चांगलेच राजकारण तापले आहे. आनंद मोहनच्या सुटकेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. त्यावरुनच आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी बिहार सरकारवर हल्लाबोल केला. ओवेसींनी एकाच वेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

बिहार सरकारच्या निर्णयाने पुन्हा हत्या : गोपालगंजचे जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांची जमावाने हत्या केली होती. त्यानंतर बिहार सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची पुन्हा हत्या केली जात असल्याचा हल्लाबोल खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव राज्यात त्यावेळी कोणाचे सरकार होते हे विसरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी लालू यादव हे कृष्णय्या यांच्या पत्नीला भेटले होते का ? शेवटी माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही कायद्यात बदल करत आहात याचे कारण काय? असा सवालही असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केला.

ओवेसींचा भाजपवर हल्लाबोल : बिहारमध्ये सुरू असलेल्या आनंद मोहन यांच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवरही टीका केली आहे. हे सर्व राजपूत व्होट बँकेसाठी केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ओवेसी यांनी या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. भाजप खासदारांना आनंद मोहन यांच्याबद्दल सहानुभूती आहे. यावरून भाजपचे नेतेही या सुटकेने खूश असल्याचे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले. नितीशकुमार विरोधी ऐक्याच्या नावाने देशभर फिरत आहेत. नितीश कुमार स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणवून घेत आहेत. मात्र नितीश कुमार यांनी 2024 मध्ये दलित समाजाला दलित अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्याला तुम्ही सोडल्याचे सांगाल का असेही स्पष्ट केले आहे.

एकंदरीत सर्वच राजकारणी आपापल्या परीने या प्रकरणावर राजकीय भाकरी भाजत आहेत. सध्या नितीश कुमार सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आनंद मोहन यांच्या सुटकेवर मात्र देशभरात पडसाद उमटत आहेत.

हेही वाचा - Wrestler Protest : गोल्डन गर्ल पीटी उषावर कुस्तीपटूंचा पलटवार, विनेश फोगाटने केला हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.