नवी दिल्ली COVID 19 Cases Rise : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये कोरोनाच्या इन्फ्लूएन्झासह नवीन JN.1 व्हायरसबाबतत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं किंवा शक्य असल्यास अशा ठिकाणी मास्क वापरावं. घराबाहेर असताना नाक, तोंड किंवा डोळ्यांना वारंवार हात लावू नये, असं जागतिक आोरोग्य संघटनेनं म्हटलंय.
JN.1 पासून आरोग्याला कमी धोका : आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोना व्हायरस जागतिक स्तरावर सर्व देशांमध्ये पसरत आहे. मात्र, JN.1 व्हायरसपासून सार्वजनिक आरोग्यासाठी कोणताही धोका नाही. या विषाणूचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार राहण्याची गरज आहे. तसेच, या विषाणूचं निरीक्षण सुरू ठेवण्यासाठी आपण तयार राहायला हवं.
विषाणुचा प्रसार जागतिक स्तरावर : WHO च्या दक्षिण-पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितलं की, यासाठी देशांना मॉनिटरिंग, सिक्वेन्सिंग मजबूत करावं लागेल. तसंच डेटाचं शेअरिंग सुनिश्चित करावं लागेल.' 'डब्ल्यूएचओ'नं JN.1 चं वर्गीकरण केलं आहे. अलिकडच, अनेक देशांमध्ये JN.1 ची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. या विषाणुचा प्रसार जागतिक स्तरावर वेगानं वाढत आहे.
JN.1 चा धोका कमी : JN.1 चा आरोग्याला सध्या धोका जागतिक स्तरावर कमी आहे. या प्रकारामुळं इतर व्हायरल बॅक्टेरियाच्या संसर्गामध्ये कोविड-19 ची प्रकरणं उद्भवू शकतात, अशी भीती आहे. विशेषतः ज्या देशांमध्ये हिवाळा सुरू आहे, त्या देशात या प्रकणात वाढ होण्याची शक्यता आहे, असं डॉ. खेत्रपाल सिंह म्हणाल्या. सुट्ट्यांच्या काळात लोक प्रवास करतात, एकत्र राहतात, अशा ठीकाणी हवेचं परिसंचरण (व्हेंटिलेशन) होत नाही. त्यामुळं श्वासोच्छवासाचा आजार होऊ शकतात. यामुळं विषाणूचा प्रसार होण्यास मदत होते, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे, असं डॉ. खेत्रपाल सिंह यांनी म्हटलंय.
कोविड लसीकरणावर भर : WHO नं आजारी असलेल्या लोकांसाठी कोविड-19, इन्फ्लूएंझा विरूद्ध लसीकरणाच्या महत्त्वावर भर दिला. WHO नं मंजूर केलेल्या सर्व COVID-19 लसी, JN.1 सह सर्व कोविडच्या विषाणूंपासून संरक्षण करत राहतील.
हेही वाचा -