नवी दिल्ली : आज दिल्ली विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन झाले. या अधिवेशनाला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका चौथी पास राजाची गोष्ट सांगितली. या गोष्टीचा संदर्भ देत त्यांनी देशातील राजकीय पक्ष आणि नेत्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाला की, माझ्या कथेत एक राजा आहे, पण राणी नाही. राजा चौथीपर्यंत शिकला होता. त्यानंतर त्याने शिक्षण सोडले. त्याने चहाच्या दुकानात काम केले. पण त्याला राजा बनण्याची आवड होती. तो एके दिवशी राजा झाला. पण अभ्यास न करण्याची खंत त्याच्या मनात कायम राहिली. मग राजाने एम.ए.ची बनावट पदवी मिळवली. याबाबत माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागितली असता त्यांनी लोकांवरच 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
-
एक चौथी पास राजा की कहानी...
— AAP (@AamAadmiParty) April 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
WATCH CM @ArvindKejriwal LIVE in Delhi Assembly 👇🏼https://t.co/aFCcX9OAzu
">एक चौथी पास राजा की कहानी...
— AAP (@AamAadmiParty) April 17, 2023
WATCH CM @ArvindKejriwal LIVE in Delhi Assembly 👇🏼https://t.co/aFCcX9OAzuएक चौथी पास राजा की कहानी...
— AAP (@AamAadmiParty) April 17, 2023
WATCH CM @ArvindKejriwal LIVE in Delhi Assembly 👇🏼https://t.co/aFCcX9OAzu
नोटाबंदीवरही टीका : अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणादरम्यान नोटाबंदी आणि शेतकऱ्यांसाठी तीन कृषी कायदे लागू केल्यामुळे लोकांना कसा त्रास झाला हे देखील सांगितले. ते म्हणाले की, निरक्षर राजामुळे देशाच्या समस्या हळूहळू वाढत गेल्या. राजा असे निर्णय घेत राहिला की लोक नाराज झाले. केजरीवाल म्हणाले की, या आधी एक राजा आला होता, मोहम्मद बिन तुघलक. तो सुद्धा असेच निर्णय घेत असे.
मित्राचा संदर्भ देऊन उपरोधिक टोला : केजरीवाल पुढे म्हणाले की, एके दिवशी राजाला वाटले की तो आता राजा आहे, मात्र किती राहणार? त्यामुळे तो पैसे कमवू लागला. मात्र पैसे कमवल्याने प्रतिमा खराब होईल. मग त्याने आपल्या मित्राला बोलावून त्याला सांगितले की, मी राजा आहे. मी तुला सर्व सरकारी कंत्राटे मिळवून देईन. मी तुला सर्व सरकारी पैसे मिळवून देईन. नाव तुझे, पैसे माझे. तुला 10 टक्के कमिशन मिळेल. मित्राने याला होकार दिला. त्यानंतर दोघांनी मिळून देश लुटला.
'मी अत्यंत प्रामाणिक' : त्यानंतर केजरीवाल यांनी ही गोष्ट पुढे नेली आणि सांगितले की, आता जेव्हा राजाविरोधात आवाज उठू लागला तेव्हा त्याने लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. त्याने त्या महान देशाची पार वाट लावली. त्या देशात एक छोटेसे राज्य होते. त्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या जनतेची खूप काळजी घेत असत. ते मुख्यमंत्री अत्यंत प्रामाणिक होते. ते सुशिक्षित होते. जनतेची महागाईपासून सुटका करण्यासाठी त्यांनी वीज मोफत केली. त्यामुळे चौथी पास असलेला राजा वेडा झाला. त्या राजाने मुख्यमंत्र्यांना बोलावून विचारले की तुमची हिम्मत कशी झाली? जेव्हा मुख्यमंत्र्याने गरिबांच्या शाळा दुरुस्त करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांना बोलावले आणि म्हणाले, काय करतोय? मुख्यमंत्र्यांनी उपचार मोफत केले, मोहल्ला क्लिनिक उघडले. त्यानंतर तर राजा पुरता वेडा झाला.
विशेष अधिवेशनावर नायब राज्यपालांचा आक्षेप : नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यावर आक्षेप घेतला आणि याबाबत केजरीवालांना पत्रही लिहिले. सोमवारी विधानसभेत यावर चर्चा झाली. यानंतर दिल्ली विधानसभा अध्यक्ष राखी बिडलान यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवले. लेफ्टनंट गव्हर्नरांना चौकशी समितीसमोर बोलावता येईल की नाही यावर समिती विचार करेल, असे ते म्हणाले.
हेही वाचा : Delhi Liquor Scam : दारू घोटाळ्या प्रकरणी मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ