ETV Bharat / bharat

Arvind Kejriwal on BJP : 2024 मध्ये भाजपाला सत्तेवरून दूर करणं ही सर्वात मोठी देशभक्ती; अरविंद केजरीवालांचं टीकास्त्र

Arvind Kejriwal on BJP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की 2024 मध्ये भाजपाला सत्तेवरून हटवणं ही सर्वात मोठी देशभक्ती असेल. 2014 आणि 2019 मध्ये त्यांना ऐतिहासिक बहुमत मिळाले होते. त्यांना हवे असतं तर ते देशाची प्रचंड प्रगती करू शकले असते. पण ते अपयशी ठरले.

Arvind Kejriwal on BJP
Arvind Kejriwal on BJP
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 1:10 PM IST

नवी दिल्ली Arvind Kejriwal on BJP : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आपल्या मतदारसंघातील स्वयंसेवकांना संबोधित करताना एक वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, 2014 आणि 2019 मध्ये देशातील जनतेनं भाजपाला ऐतिहासिक बहुमत दिलं. भाजपाला हवं असतं तर ते देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकले असते, पण आज संपूर्ण देशाचं वातावरण बिघडलंय. सर्वत्र मारामारी, गुंडागर्दी, भ्रष्टाचार, लुटमार सुरू आहे. नोकऱ्या सतत कमी होत आहेत. देशात लोकसंख्या वाढत आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या देशातील जनतेसमोरील तीन सर्वात मोठ्या समस्या आहेत. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुका देशासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. इंडिया आघाडी टिकली तर 2024 मध्ये भाजपाचं सरकार स्थापन होणार नाही, असंही केजरीवाल म्हणाले.

  • #WATCH दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने कहा, "सबसे बड़ी देशभक्ति 2024 में बीजेपी को सत्ता से हटाना होगा। 2014 और 2019 में उन्हें ऐतिहासिक बहुमत मिला था, अगर वे चाहते तो देश में जबरदस्त प्रगति कर सकते थे लेकिन असफल रहे।" (22.10) pic.twitter.com/06Wvj15rLM

    — ANI_HindiNews (@AHindinews) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सामान्य लोकांनी केली आम आदमी पार्टीची स्थापना : मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, छठ सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना ते म्हणाले की, मी जेव्हा जेव्हा माझ्या विधानसभा मतदारसंघात जातो तेव्हा तिथले लोक केवळ दिल्ली सरकारचंच कौतुक करतात. तसेच आमच्या स्वयंसेवकांचंही कौतुक करतात. लोकं म्हणतात की, आमचे स्वयंसेवक खूप चांगले आहेत. आम्ही कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीतून आलेलो नाहीत. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, आतिशी, सौरभ भारद्वाज, हे सर्व माझ्यासोबत अगदी सामान्य लोक होते. आम्ही सामान्य लोकांनी मिळून आम आदमी पार्टीची स्थापना केली. त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे स्वयंसेवकही सामान्य पार्श्वभूमीतून आलेले आहेत. इतर पक्षांचे लोक त्यांच्या भागात अनेकदा गुंडगिरी करताना आणि शिवीगाळ करताना दिसत असल्याचं केजरीवाल म्हणाले.

2016 मध्ये नोटबंदीमुळं भारताची अर्थव्यवस्था किमान 10 वर्षे मागे गेली आहे. लोकांचे उद्योगधंदे, कारखाने, व्यवसाय बंद होते. आज संपूर्ण देशातील व्यापारी दु:खी आहेत. आधी नोटबंदी आणि नंतर जीएसटी आणली. जीएसटी खूप गुंतागुंतीचा विषय आहे, तो कोणालाच कळत नाही-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नोटबंदीवरुन भाजपा सरकारवर हल्लाबोल : अरविंद केजरीवाल म्हणाले की, 2016 मध्ये या लोकांनी भ्रष्टाचार दूर करण्यासाठी 1000 रुपयांच्या नोटा रद्द करत असल्याचं सांगितलं. काळा पैसा मोठ्या नोटांमध्ये ठेवणं सोयीचं आहे. पण त्यांनी 1000 रुपयांच्या नोटा बदलून 2000 रुपयांच्या नोटा आणल्या आहेत. नोटाबंदीनं भ्रष्टाचार किंवा दहशतवाद संपला नाही. सात वर्षेही उलटली नाहीत तर त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटाही बंद केल्या. त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा का आणल्या, हे कोणालाच समजू शकलेलं नाही. असा नोटबंदीचा प्रकार जगातील कोणत्याही देशात दिसला नाही. 2000 रुपयांच्या नोटा का बंद केल्या हेही ते सांगत नाहीत.

12 लाख श्रीमंतांनी घेतले परदेशी नागरिकत्व : मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, भाजपा सरकारनं सर्व मोठ्या उद्योगपतींच्या मागे ईडी-सीबीआय तैनात केलंय. गेल्या काही वर्षात 12 लाख बड्या श्रीमंत आणि उद्योगपतींनी भारतीय नागरिकत्व सोडून विदेशात जाऊन तेथील नागरिकत्व घेतलंय. एकीकडं आपण म्हणतो की परकीय गुंतवणुकीची गरज आहे आणि दुसरीकडं आपल्या देशातून गुंतवणूक बाहेर जात आहे. देशातील उद्योजक परदेशात गेले तर भारतात उद्योग कोण उभारणार, व्यवसाय कोण करणार आणि आपल्या तरुणांसाठी रोजगार कसा निर्माण होणार? वर्षभरात दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र, सध्याच्या नोकऱ्याही दिवसेंदिवस कमी होत असल्याचं केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Kejriwal bungalow renovation case : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, बंगला नूतनीकरण प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू
  2. AAP will Not leave INDIA Alliance : आम आदमी पार्टी INDIA साठी वचनबद्ध - केजरीवाल
  3. Jawan Movie : अरविंद केजरीवाल यांनी केली ३ दिवसांची सुट्टी जाहीर; शाहरुख खानच्या चाहत्यांना बसला मोठा धक्का...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.